बीडच्या आष्टीत कत्तलखान्यावर छापा; 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, 11 आरोपींवर गुन्हा दाखल विनोद जिरे
महाराष्ट्र

बीडच्या आष्टीत कत्तलखान्यावर छापा; 13 लाखांचा मुद्देमाल जप्त, 11 आरोपींवर गुन्हा दाखल

बीडच्या दौलावडगावमध्ये बीड पोलिसांची कारवाई

विनोद जिरे

बीड: बीडच्या दौलावडगाव येथील कत्तखान्यावर बीड (Beed) पोलिसांनी छापा टाकला आहे. यावेळी गोवंशीय मांस, जनावरांसह एक टेम्पो असा एकूण १३ लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी (police) जप्त केला आहे. बीडच्या आष्टी (Ashti) तालुक्यातील असणाऱ्या, दौलावडगाव शिवारात पत्र्याचे शेडमध्ये आरोपी खलील अरुण कुरेशी, दलील हारून कुरेशी यांनी कत्तलखाना सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती.

हे देखील पहा-

मिळालेल्या माहितीवरून बीड पोलिसांनी (police) छापा मारला असता, पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना (Slaughterhouse) सुरू असल्याचे दिसून आले आहे. यावेळी तब्बल 40 जनावरांची कत्तल केल्याचे समोर आले असून 6 लाख 20 हजार रुपयांच्या 5 टन मांसासह टेम्पो आणि कार असा एकूण 13 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात 11 आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नगर-बीड जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात डोंगराच्या पायथ्याला पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना सुरू केल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस अधीक्षक यांनी सहायक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांना कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार कुमावत यांनी केजचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांच्या नेतृत्वाखाली कर्मचाऱ्यांचे पथक कारवाईसाठी रवाना केले. त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारला असता पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलखाना सुरू असल्याचे दिसून आले. त्या ठिकाणाहून तीन इसम पळून गेले आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: फक्त जास्त मीठानेच ब्लड प्रेशर वाढत नाही; साध्या वाटणाऱ्या या 6 सवयीही ठरतायत कारणीभूत

Mumbai : फलटणच्या डॉक्टरने मुंबईत संपवलं आयुष्य, हातावर लिहिलेल्या मेसेजमध्ये केले गंभीर आरोप; वैद्यकीय अधीक्षक निलंबित

Maharashtra News Live Update:राहुल गांधी यांना सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाचे दिले जाणार निमंत्रण

Tea vs Coffee: चहा की कॉफी, आरोग्यासाठी सर्वात जास्त घातक काय? जाणून घ्या!

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

SCROLL FOR NEXT