RAHUL GANDHI FUTURE PM BANNERS IN PUNE; POLITICAL BUZZ INTENSIFIES saam tv
महाराष्ट्र

देशाचा पुढचा पंतप्रधान कोण? पुण्यातील चौकाचौकात झळकले बॅनर; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Future Prime Minister Banners In Pune : राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी शहरातील विविध भागांत ‘हिंदुस्तानचे भावी पंतप्रधान’ असा उल्लेख असलेले बॅनर झळकले. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

Bharat Jadhav

  • राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यापूर्वी शहरातील विविध भागांत ‘भावी पंतप्रधान’ असा उल्लेख असलेले बॅनर झळकले.

  • राहुल गांधींच्या स्वागतासाठी हे बॅनर लावण्यात आले.

  • पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात आगामी काळात सत्ताबदल होण्याचा दावा केलाय.

आगामी काळात देशात सत्ताबदल नक्की होणार आहे. मात्र हा बदल काँग्रेसमुळे किंवा कोणत्याही एका राजकीय पक्षामुळे होणार नाही, तर गेल्या 12 वर्षांतील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारभारामुळेच सत्ताबदलाची परिस्थिती निर्माण होईल, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलाय. त्याचदरम्यान पुण्यात देशाच्या भावी पंतप्रधान कोण होणार याचे बॅनर लावण्यात आलेत.

हिंदुस्थानचे भावी पंतप्रधान

लोकसभेचे विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी हे उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये स्वागताचे बॅनर लावण्यात आलेत. पुण्यातील शास्त्री रोडसह विविध भागांमध्ये राहुल गांधींचा हिंदुस्तानचे भावी पंतप्रधान असा उल्लेख केलेले बॅनरवर लावण्यात आलेत.

राहुल गांधी यांचा भावी पंतप्रधान असा उल्लेख या सर्व बॅनर्सवर करण्यात आलेला आहे, पुण्यामध्ये ही बॅनरबाजी करण्यात आलेली आहे. 'छात्रो की गुंज' या कार्यक्रमाच्या अंतर्गत राहुल गांधी पुण्यामध्ये कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी हे बॅनर्स लावण्यात आलेत.

नगरसेवक- पदाधिकाऱ्यांच्या भेटीचा कार्यक्रम

राहुल गांधी पुणे दौऱ्यावर महानगरपालिकेतील नगरसेवकांची भेट घेणार आहेत. दरम्यान छात्र के गुंज कार्यक्रम जरी राजकीय नसला तरी राहुल गांधी शहरातील पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत. राहुल गांधी छात्र के गुंज कार्यक्रमात महिलांची संवाद साधणार आहेत, त्याचवेळी ते काँग्रेस पदाधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत.

देशात सत्ताबदल नक्की होणार

राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देशात सत्ताबदल होणार असल्याचा दावा केलाय. 2029 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. त्यामुळे भाजपकडून आतापासूनच पुढील नेतृत्वाचा चेहरा बदलण्याचे प्रयत्न सुरू झालेत. देशातील राजकीय परिस्थिती वेगाने बदलत असून आगामी काळातील नेतृत्वावर चर्चा सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Farmer Scheme: आनंदी आनंद! कर्जमाफीनंतर शेतकरी, शेतमजुरांसाठी राज्य सरकारनं घेतला महत्त्वाचा निर्णय

पुढील २० तासात महाराष्ट्रासह २५ राज्यांना मुसळधार पावसाचा अलर्ट; ताशी ७५ किमी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

गणेशोत्सवात 12 दिवस ड्राय डे! मद्यविक्रीला कुठे राहणार बंदी?

MPSC विद्यार्थ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या मान्य; सरकारनं घेतले तीन मोठे निर्णय

देवाभाऊंच्या घरी जरांगेभाऊ जाणार, अमृता फडणवीसांकडून जरांगेंना जेवणाचं आमंत्रण

SCROLL FOR NEXT