भांडण नवरा बायकोचे आणि झळ आजूबाजूच्या लोकांना... (पहा व्हिडिओ) Saam Tv
महाराष्ट्र

भांडण नवरा बायकोचे आणि झळ आजूबाजूच्या लोकांना... (पहा व्हिडिओ)

पत्नीशी भांडताना स्वतःचे घर जाळताना आजूबाजूच्या दहा घरे जळून खाक झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव घडली आहे.

ओंकार कदम

सातारा - पती पत्नीच्या भांडणाची झळ गावातील 10 घरांना बसून जवळपास 50 लाख रुपयांचे नुकसान झाल्याने संतप्त गावकऱ्यांनी नवऱ्याला चोप दिल्याची घटना पाटण तालुक्यातील माजगाव येथे घडली आहे. पत्नीशी भांडताना स्वतःचे घर जाळताना आजूबाजूच्या दहा घरे जळून खाक झाल्याची घटना सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील माजगाव घडली आहे. या घटनेत सुमारे पन्नास लाखाहून अधिक नुकसान झाले आहे.

पोलिसांनी संबंधित पतीवर गुन्हा दाखल केला आहे.पाटण तालुक्यातील माजगाव या गावातील संजय पाटील आणि त्याची पत्नी पल्लवी यांची घरगुती कारणातून भांडण सुरू होती. भांडण एवढ्या टोकाला गेले की पतीने स्वतःच्या घराला आग लावली. आग लावली तेंव्हा घरातील सिलेंडर ने ही पेट घेतला. नंतर या आगीने रुद्र रूप धारण करत आजूबाजूच्या सुमारे दहा घरांना त्याचा फटका बसला आहे . आजूबाजूची सुमारे दहा घरे जळून खाक झाली.

या आगीत सुमारे पन्नास लाखाहून अधिक रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत संबंधित पतीला पोलिसांनी अटक केली आहे. संबंधित पतीला मल्हारपेठ पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घर जाळणाऱ्या पतीला ग्रामस्थांनी आगीतून बाहेर काढत चांगला चोप दिला.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

NEETचा गोंधळ संपता संपेना! नागपुरच्या विद्यार्थ्याला दिलं 'अबू धाबी'चं केंद्र

Maharashtra News Live Update: शिर्डीत सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा...

Dombivli News : राज ठाकरे आणि मराठी माणसांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट; डोंबिवलीत मनसे आक्रमक, थेट पोलीस ठाण्यावर धडकले

धुळे हादरलं! कर्तव्यावर असलेल्या पोलिसांना गावगुंडांची बेदम मारहाण; थरारक व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Monsoon Update: राज्यात कधीपासून सुरू होणार पाऊस? मान्सूनबाबत महत्वाची अपडेट आली समोर

SCROLL FOR NEXT