किरीट सोमय्यां बाहेर पडताच कोर्लई ग्रामपंचायतीचे शिवसैनिकांकडून शुद्धीकरण  Saam TV
महाराष्ट्र

किरीट सोमय्यां बाहेर पडताच कोर्लई ग्रामपंचायतीचे शिवसैनिकांकडून शुद्धीकरण

किरीट सोमय्या कोर्लई गावात आल्याने शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले असून दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रायगड : कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या (Rashmi Thackeray) नावावर 19 बंगले असून, त्यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. याबद्दल त्यांनी तक्रार केली असून, तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी ते आज कोर्लई गावात आले होते.

कोर्लई गावात रश्मी ठाकरेंच्या नावावरती 19 बंगले असल्याचा आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केल्यानंतर कोर्लई गावाच्या सरपंचांनी हे बंगले नसल्याचे सांगितलं तसंच हे बंगले नाहीत तर छोटी घरे असून त्या घरांचा कर रश्मी ठाकरे यांनी भरल्याचे त्यांनी दोन दिवसांपूर्वी सांगितलं आहे. मात्र कोर्लई गावाच्या सरपंचांनी केलेल आरोप खोटे असल्याचं सोमय्यांनी सांगितल होत.

हे देखील पहा -

दरम्यान आज किरीट सोमय्या कोर्लई गावात येत असल्याने शिवसैनिक आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आले असून दोन्ही कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. तसंच किरीट सोमय्याांनी कार्लई गावात जाऊन त्यांनी कोर्लई ग्रामपंचायतीमध्ये काही कागदपत्रांची पाहणी केली यावेळी पंचायतीमध्ये सरपंच आणि काही स्थानिक ग्रामस्थ होते. आणि याच दरम्यान सोमय्या कार्लई ग्रामपंचायतीमधून बाहेर येताच शिवसैनिकांनी गोमुत्र शिंपडून ग्रामपंचायतीचे शुद्धीकरण केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: ओमराजे सध्या कोर्टात हजर

Cancer symptoms: शरीरात ही ५ मोठी लक्षणं दिसली तर असू शकतो कॅन्सरचा ट्यूमर

चटकदार अन् भरपेट! अंबाडीच्या पानांच्या बनवा पातोड्या; सोपी स्टेप बाय स्टेप रेसिपी लगेचच करा नोट

आषाढी वारीसाठी सरकारचं मोठं गिफ्ट! वारकऱ्यांसाठी 5500 ST बसेस, कोणत्या मार्गावरून धावणार?

International Yoga Day : योगा करण्यापूर्वी चुकूनही करू नका ‘ही’ ५ कामे, निष्काळजीपणा पडेल महागात

SCROLL FOR NEXT