eknath shinde news  saam tv
महाराष्ट्र

'...तर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही'; भरसभेत तरुणाचं मुख्यमंत्र्यांना आवाहन

'तुम्ही फक्त पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छ करा, तर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, असं आवाहन तरुण वारकऱ्यांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरसभेत केले.

गोपाल मोटघरे

Eknath Shinde News : राज्याच्या राजकारणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध शिवसेना असा राजकीय रणसंग्राम रंगला आहे. शिवसेनेचे ठाकरे गट आणि शिंदे गट या दोघांच्या राजकीय संघर्षामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. याचदरम्यान, आळंदीतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना वारकऱ्यांनी साकडं घातलं आहे.

'तुम्ही फक्त पवित्र इंद्रायणी नदी (River) स्वच्छ करा, तर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, असं आवाहन तरुण वारकऱ्यांने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भरसभेत केले.

आज, शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आळंदीत एका कार्यक्रमात वारकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वारकऱ्यांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले, माणसामध्ये स्पर्धा असावी. मात्र, ती स्पर्धा लोकं हितासाठी असावी. स्वत: साठी नसावी. म्हणून आम्ही जो स्पर्धा घेण्याचा कार्यक्रम ती महिन्यांपूर्वी केला. तो कार्यक्रम लोकांच्या हितासाठी होता. स्वत:च्या हितासाठी नाही'.

'आषाढी वारीला पांडुरंगाची पूजा करायला मिळणं हे भाग्य आहे. अनेक जन चिंता करत होते. पण आम्ही आमच्या निर्णयावर समाधानी होतो. वारकऱ्यांनी आम्हाला स्वीकारलं. तेव्हाच आम्हाला कळलं होतं', असे मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले. आळंदीला देखील विकास करायचा आहे. मोठी विकास कामे करायची आहेत, असे आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिले.

दरम्यान, पवित्र इंद्रायणी गटारगंगा म्हणून दुर्गंधीत झाली आहे. या इंद्रायणीच्या पावित्र्यासाठी आज भर सभेत वारकरी संप्रदायाचे शिक्षण घेणारा विद्यार्थी उभा रहिला. तुम्ही फक्त पवित्र इंद्रायणी नदी स्वच्छ करा, तर तुमच्या केसाला धक्का लागणार नाही, असं आवाहन तरुण वारकऱ्याने मुख्यमंत्र्याला केले. त्यांच्या बेधडक सुचनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिसाद दिला. इंद्रायणीसाठी स्वच्छता मोहिम हाती घेणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Accident : सण साजरा करायला गेलेले परतलेच नाही! २४ तासांत ४९ जणांचा मृत्यू; भीषण घटनांनी देश हादरला

Gold Price Today : सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात सोनं किती रुपयांनी स्वस्त; वाचा १८, २२ आणि २४ कॅरेटचे दर

Sanjay Raut : राज्यावर ११ लाख कोटींचं कर्ज, संजय राऊतांची सरकारवर जोरदार टीका

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा; भाजपाच्या नेत्याकडून ५१ टन चारा वाटप, सोलापुरात आदर्श उपक्रम

Maharashtra News Live Update: नागपूर पदवीधर निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली - देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT