Garlic Tomato Price Saam tv
महाराष्ट्र

Garlic Tomato Price : लसूण, टोमॅटोचे दर घसरले; नारायणगाव बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव, लसूणचे दर ४०० ने खाली

Pune News : उत्पादन खर्चाच्या तुलनेत टोमँटोला मिळणारा बाजारभाव ४० टक्क्यांनी तोट्यात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी टोमॅरोवर करण्यात आलेला खर्च देखील निघणे कठीण झाले आहे

Rajesh Sonwane

रोहिदास गाडगे/ संजय राठोड 
पुणे/ यवतमाळ
: एकवेळ लसणाचे दर गगनाला भिडले होते. मात्र यात मागील काही दिवसांपासून घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. साडेपाचशे रुपये प्रतिकिलो इतके लसूणच्या दर पोहचले असताना यात चारशे रुपयांची घसरण होऊन बाजारात हे दर १०० ते १२० रुपयांवर गेले आहेत. तर पुण्याच्या नारायणगाव बाजारात टोमॅटोला कवडीमोल भाव मिळत आहे. 

उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर आंबेगाव खेड शिरुर तालुक्यात बाराही महिने टोमँटोचे उत्पादन घेतलं जाते. हा टोमँटो उत्तर भारतात मोठ्या प्रमाणावर निर्यात होतो. टोमँटोवर मोठा भांडवली खर्च करुन उत्पादित केला जातो. मात्र आता उत्पादन खर्चाच्या तुलनेत टोमँटोला मिळणारा बाजारभाव ४० टक्क्यांनी तोट्यात असल्याने शेतकरी हतबल झाला आहे. परिणामी टोमॅरोवर करण्यात आलेला खर्च देखील निघणे कठीण झाले आहे.    

दोनशे रुपयांपर्यंत घसरण 

दोन महिन्यापुर्वी टोमँटोला ५०० ते ६०० रुपयांचा बाजारभाव मिळत होता. आता अगदी हे दर १५० ते २०० रुपयांपर्यंत खाली कोसळला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा टोमॅटो तोडणीचा व वाहतुकीचा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. टोमॅटोच्या दरात आणखी घसरण झाल्यास टोमॅटो फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार आहे. 

लसूणचे दर १२० रुपयांवर आले खाली

यवतमाळ : मागील काही महिन्यांपासून यवतमाळ जिल्ह्यात लसूणाचे भाव वधारल्याने लसणाची ठसण वाढली होती. लसूण बाजारात साडेपाचशे रुपये किलो दराने विकल्या जात होता. मात्र सध्या स्थितीत लसणाचे भाव १२० रुपये किलो एवढे असल्याने लसणाची ठसण उतरली आहे. लसूण साडेपाचशे रुपये किलोपर्यंत तडकला होता. आता नवीन लसुन बाजारात आल्याने आवक वाढली आहे. त्यामुळे किरकोळ भावात लसूण १२० रुपये प्रति किलो विकला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT