महाराष्ट्र

आता माझा बळी जाणार, आणखी एका डॉक्टर महिलेचा खळबळजनक VIDEO; भाजप आमदाराचंही नाव

pune doctor women video : डॉ. गौरी गर्जे यांच्यानंतर आणखी एका डॉक्टर महिलेचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे. या डॉक्टर महिलेने भाजप आमदारासहित चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप केलेत.

Akshay Badve

डॉक्टर स्नेहल घुगे यांनी व्हिडिओद्वारे तीन-साडेतीन वर्षांपासून छळ

व्हिडिओमध्ये काही राजकीय नेत्यांची नावे

चित्रा वाघ यांनी आरोप नाकारत पोलिसांकडे केली गुन्हा दाखल करण्याची मागणी

पुणे : डॉ. गौरी गर्जे पालवे यांच्यानंतर माझा बळी जाणार, असे म्हणत पुण्यातील डॉक्टर स्नेहल घुगे या विवाहितेने साडे तीन वर्षांपासून माझा छळ सुरु असल्याचा गंभीर आरोप करत एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केलाय. घटस्फोट हवा असल्याने पती माझ्यासोबत राहत नाहीत, जाणून बुजून गायब असल्याचा आरोप स्नेहल घुगेंनी केला.

धक्कादायक म्हणजे स्नेहल घुगे यांनी भाजप आमदार नारायण कुचे, भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे नाव घेत गंभीर आरोप केले. यावर काल चित्रा वाघ यांनी पुणे पोलिस आयुक्त यांची भेट घेतली. "घुगे यांच्याशी माझा कधी ही संबंध आला नाही ना मी त्यांच्यावर कधी फोन वर बोलले ना कधी पाहिलं अशा खोटं बोलणाऱ्या महिलेवर गुन्हा दाखल व्हावी अशी मागणी चित्रा वाघ यांनी काल केली.

यावर आज बुधवारी स्नेहल घुगे यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. स्नेहल घुगे म्हणाल्या, "चित्रा वाघ यांचा गैरसमज झाला आहे. चित्र वाघ यांच्या पर्यंत स्टेटमेंट पोहोचलं नाही. मी काय कोणती नेता नाही. माझ्या बद्दल गैरसमज वाढतील म्हणून ही प्रेस घेतली आहे."

आतापर्यंत पोलीस स्टेशन वर दबाव येत होता. केस करून काही फायदा झाला नसता. आम्ही दिवस दिवस पोलीस स्टेशनवर चकरा मारत होते. देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे की राजकीय हस्तक्षेप नसेल तर मी केस करेन चित्र वाघ आई सारख्या आहेत. गैरसमज करून देवू मला. माझ्या कडे सगळ्या गोष्टींचे पुरावे आहेत नवऱ्याने समोर यावं. मी खरी आहे माझ्या कडे पुरावे आहेत," असं त्या म्हणाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शासकीय वसतीगृहातील 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा; जेवणानंतर होऊ लागला उलट्या आणि जुलाबचा त्रास

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये शासकीय वस्तीगृहात 40 ते 50 विद्यार्थ्यांना विषबाधा

जयंत पाटलांना मोठा धक्का; निकटवर्तीयाचं नगराध्यक्षपद रद्द, काय आहे कारण?

Sunday Horoscope : महत्त्वाची कामे पूर्ण करा! 5 राशींच्या व्यक्तींचे नशीब पालटणार; वाचा शनिवारचे राशीभविष्य

गावाशी असलेलं जिव्हाळ्याचं नातं जपलं; ZP शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, सामाजिक बांधिलकीचा आदर्शांप्रती

SCROLL FOR NEXT