महाराष्ट्र

SPPU Admission 2025: पुणे विद्यापीठात प्रवेश परीक्षा अर्ज प्रक्रियेला सुरुवात, या तारखेपर्यंत मुदत

Pune University Admission Form Eligibility Exam Details : सावित्रिबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेश प्रक्रिया घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, त्याबाबत विद्यापीठ प्रशासनाने अधिक माहिती दिली आहे.

Saam TV News

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध विभागांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या सामाईक पात्रता परीक्षेची (Common Entrance Teste) घोषणा करण्यात आली आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३ मार्च आहे. विद्यापीठ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षेचा कालावधी १८ ते २० मार्च दरम्यान असेल, तर पदवी अभ्यासक्रमासाठी ४ एप्रिल रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

पुण्यातील विद्यापीठाच्या मुख्य संकुलासोबतच नाशिक येथील उपकेंद्रातील अभ्यासक्रमाचाही या सामाईक पात्रता परीक्षेत समावेश आहे. पुणे विद्यापीठात ५२ विभाग असून, दरवर्षी शेकडो विद्यार्थी आहिल्यानगर, नाशिक, पुणे तसेच देशभरातील विविध भागांतून प्रवेशासाठी अर्ज करतात.

प्रवेश परीक्षेचे स्वरूप

एकूण गुण: १००

सामान्य ज्ञान व अभियोग्यता चाचणी: २० गुण

मुख्य विषयाचा पेपर: ८० गुण

चुकीच्या उत्तरासाठी दंड: प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक चतुर्थांश गुण वजा

परीक्षेचा कालावधी: २ तास

परीक्षा पद्धती: ऑनलाइन

इच्छुक विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मुंबईत येणारच, १२ सप्टेंबरला निर्णय होणार- मनोज जरांगे

Rajpal Yadav: ५ कोटी जमा करा, नाहीतर सरेंडर करा; राजपाल यादवला सुप्रीम कोर्टाचा दणका

Ration Card: ३ आठवड्यात हे काम कराच, अन्यथा तुमचे रेशनकार्ड अचानक बंद होणार

मुख्यमंत्र्यांच्या नावाने बनावट सोशल अकाऊंट, होमगार्डला अटक; जळगाव कनेक्शन आले समोर

Pune News: दहीहंडीत अश्लील नृत्य, पुण्यात डान्सर निशा मुंबईकर अन् शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

SCROLL FOR NEXT