Pune Traffic Police takes major action Saam TV News
महाराष्ट्र

Pune News : धर, धर, धर...; धुलीवंदनला पुणे वाहतूक पोलिसांचा दणका, बेशिस्त अन् तळीरामांवर मोठी कारवाई

Pune Traffic Police Action : पुणे वाहतूक पोलिसांनी शहरात ८ हजार ५५२ वाहनांची तपासणी केली. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ४०२ तळीरामां वर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली.

Prashant Patil

पुणे : राज्यात गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत चाललं आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आलंय. त्यातल्या त्यात हेच गुन्हेगारीचं प्रमाण पुण्यात चांगलंच वाढलं आहे. काल धुलीवंदनच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर वाहतूक शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पुणे शहर वाहतूक शाखेकडून होळी आणि धुलीवंदन साजरा करताना पुणेकरांनी सुरक्षा तथा शांतता अबाधित राखण्याच्या उद्देशाने केलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

पुणे वाहतूक पोलिसांनी शहरात ८ हजार ५५२ वाहनांची तपासणी केली. मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ४०२ तळीरामांवर ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई करण्यात आली. शहरातील बेशिस्त वाहन चालकांना लगाम घालण्यासाठी स्पेशल ड्रायव्हिंग अंतर्गत शहरात ९० ठिकाणी नाकांबदी लावण्यात आली होती.

शहरात ३७ वाहतूक विभाग आणि संबंधित पोलीस स्टेशनकडून लावण्यात आलेल्या नाकाबंदीमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकावर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ट्रिपल सीट,राँग साईड, ड्रंक अँड ड्राईव्ह अशांवर कारवाई करत तब्बल ३८६ वाहनं जप्त करण्यात आलेत. एकूण ६ हजार ११८ केसेस करण्यात आल्या असून ५० लाख ९४ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update :मुंबईचे डबेवाले आजपासून सहा दिवस सुटीवर

लिव्ह-इन रिलेशनशिपमधील जोडप्यांना नवरा-बायको समजलं जाणार? जनगणनेच्या नव्या नियमामुळे चर्चांना उधाण

Heart attack: हार्ट अटॅकपूर्वी दिसणाऱ्या या ५ लक्षणांकडे महिला करतात हमखास दुर्लक्ष; शरीरात होणारे बदल ओळखा

Gold Rate Today: खुशखबर! सराफा बाजार उघडताच सोनं झालं स्वस्त; वाचा २२ अन् २४ कॅरेटचे दर

Phone Charging Tips : चार्जर नाही, तर काय झाले; 'या' स्मार्ट ट्रिक्स वापरून मिनिटांत मोबाईल फोनची बॅटरी होईल फुल

SCROLL FOR NEXT