Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : वाजेवाडी परिसरात 'पुष्पा'चा थरार; चंदन चोरांच्या हल्ल्यात तिघे जखमी

Pune News : पुण्याच्या शिरूर तालुक्यात असलेल्या वाजेवाडी परिसरात चंदन चोरी केली जात आहे. परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर चंदन चोरी करण्यासाठी आले

Rajesh Sonwane

सचिन जाधव 
पुणे
: शिरूर तालुक्याच्या वाजेवाडी परिसरात मागील दोन दिवसापासून चंदन चोरांचा धुमाकूळ सुरू आहे. परिसरातील नागरिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता चंदन चोरांकडून नागरिकांवर प्रतिहल्ला करण्यात आला. यामुळे तीन जण जखमी झाले आहेत. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 


पुण्याच्या (Pune) शिरूर तालुक्यात असलेल्या वाजेवाडी परिसरात चंदन चोरी केली जात आहे. परिसरातील नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आल्यानंतर चंदन चोरी करण्यासाठी आलेल्या चंदन चोरांना स्थानिक नागरिकांनी विरोध केला. मात्र चंदन चोर चंदनाची लाकडे चोरी करण्यासाठी पूर्ण तयारीने आल्याने नागरिकांनी केलेल्या विरोधास न जुमानता नागरिकांवरच प्रतिहल्ला करण्यास सुरवात केली. 

यावेळी चंदन चोरांकडे असलेल्या गलोरीच्या माध्यमातून नागरिकांना दगड मारणात आले. यामध्ये दगड लागून तीन जण जखमी झाले आहेत. यामध्ये एक महिला, एक मुलगा व एका तरुणाचा समावेश आहे. या चंदन चोरामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. याबाबत पोलिसात (Police) तक्रार दिली असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मंत्रालय परिसरात झाडाची फांदी पडून पोलीस कॉन्स्टेबल जखमी

Bigg Boss 20 : 'बिग बॉस २०'च्या ३ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार, 'वीकेंड का वार'ला कोण जाणार घराबाहेर?

Aadhaar Card Update : आधार कार्डधारकांसाठी मोठी बातमी! UIDAIने बदलली Face Authenticationची पद्धत, असा होणार फायदा

Gold Rate : गणेशोत्सवात सोनं खरेदीदारांना दिलासा! १० तोळे ९२०० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या 22k, 24k, 18k चे आजचे ताजे दर

Chocolate Modak vs Mawa Modak: चॉकलेट मोदक की मावा मोदक? यंदाच्या गणेशोत्सवात लहान मुलांसाठी बनवा हे दोन्ही मोदक

SCROLL FOR NEXT