Shastrinagar hotel Businessman son Gaurav Manoj Ahuja obscene videos Saam Tv News
महाराष्ट्र

Pune Crime : तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते...; पोराच्या संतापजनक कृत्यावर बाप लालबुंद

Pune Shastrinagar Youth Misconduct : माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नसून माझ्या तोंडावर केली आहे. तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते. पोलिसांवी मला शास्त्रीनगर पोलीस चौकीत बोलावलं आहे.

Prashant Patil

पुणे : पुणे शहरातील शास्त्रीनगर या गजबजलेल्या परिसरात मद्यधुंद अवस्थेमध्ये रस्त्याच्या मधोमध आपली BMW कार उभी करून तरूणांनी अश्लील चाळे केल्याची संतापजनक घटना घडली आहे. मद्यधुंद अवस्थेमध्ये तरूणांनी अश्लील चाळे करत, सिग्नलवर रस्त्याच्या मध्यभागी कार उभी करून, बाहेर येत रस्त्यावर लघुशंका केल्याची घटना समोर आली, त्यानंतर एका व्यक्तीने त्या तरूणाला जाब विचारल्यानंतर त्याने पुन्हा एकदा अश्लील चाळे केले आणि भरधाव वेगात आपली कार पळवली. ही संतापजनक घटना समोर आली आहे. आपल्या मुलाचा अशा संतापजनक कृत्याबाबत त्याच्या वडिलांकडून खंत व्यक्त केली आहे. मनोज रमेश अहुजा असं या मुलाच्या वडिलांचं नाव असून ते हॉटेल व्यावसायिक आहेत.

मुलाचे वडील नेमकं काय म्हणाले?

माझ्या मुलाने सिग्नलवर लघुशंका केली नसून माझ्या तोंडावर केली आहे. तो माझा मुलगा असल्याची मला लाज वाटते. पोलिसांवी मला शास्त्रीनगर पोलीस चौकीत बोलावलं आहे. व्हिडिओमध्ये जी गाडी दिसत आहे ती माझ्या नावावर आहे. त्यामुळे चौकशीसाठी पोलिसांनी मला बोलावलं आहे. माझ्या मुलाचं नाव गौरव मनोज अहुजा आहे. माझ्यावर जी काही कारवाई होईल ती मला मान्य आहे. मुलाचा मोबाईल सकाळपासून बंद आहे. आम्ही देखील त्याचा शोध घेत आहोत, असं म्हणत मुलांच्या वडिलांनी झालेल्या घटनेबद्दल खंत व्यक्त केली आहे.

या घटनेविरोधात सर्वपक्षीय नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरू आहे. हा तरूण मद्यधुंद असून त्याच अवस्थेत तो BMW कार चालवत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मद्यधुंद अवस्थेत त्याने केलेल्या विचित्र कृत्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. तसेच त्याच्यासोबत असलेला त्याचा मित्रही मद्यधुंद अवस्थेत होता. या प्रकरणाबाबत संबंधित तरुणावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. पुणे पोलिसांकडून तरुणांचा शोध सुरु करण्यात आला आहे. या दोन अश्लील कृत्य करणाऱ्या तरूणांचा व्हिडिओ काढलेल्या व्यक्तीने देखील व्हिडिओ शेअर करत घटनेची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sunday Horoscope : भगवान विठ्ठलाची उपासना लाभदायी ठरेल; ५ राशींच्या लोकांचा दिवस आनंदी जाणार

Maharashtra Politics : १८ वर्षानंतर ठाकरे बंधू एकत्र, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं काय होणार? वाचा स्पेशल रिपोर्ट

Maharashtra Politics : राज्याचं राजकीय समीकरण बदललं, 'ठाकरे'च विरोधी पक्षाचा चेहरा? VIDEO

नऊवारीत सजून पारंपरिक गाण्यावर महिलांचा अफलातून डान्स; व्हिडिओ एकदा पाहाच

Ashadhi Ekadashi : बा विठ्ठला... बळीराजाला सुखी ठेव, सन्मार्गाने जगण्याची सुबुद्धी दे, मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे

SCROLL FOR NEXT