Supriya Sule On Pune Rename Jijapur  Saam Tv
महाराष्ट्र

Pune Rename Jijapur : पुण्याचं नाव जिजापूर होणार? नामांतराच्या मागणीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रस्ताव आल्यास...

Pune To be Jijapur? : पुण्याचे जिजापूर करावे, अशी मागणी जोर धरू लागली असतानाच, त्यावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

लक्ष्मण साळुंखे

Supriya Sule On Pune Rename Jijapur : औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर असं नामांतर झाल्यानंतर पुण्याच्या नामांतराच्या मागणीला जोर धरू लागला आहे. पुण्याचे जिजापूर करा, अशी मागणी संभाजी ब्रिगेडनं केली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत प्रस्ताव आल्यानंतर चर्चा करू, असं त्या म्हणाल्या.

पुणे शहराचं नाव बदलून जिजापूर करावं अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. यापूर्वीही संभाजी ब्रिगेडनं ही मागणी केली होती. आता यावर राजकीय पक्षांकडून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. सुप्रिया सुळे यांनीही जालना येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

याबाबतचा प्रस्ताव आल्यानंतर चर्चा करू, असे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. मकर संक्रांतीनिमित्त कुणाशी तुम्हाला गोड बोलायला आवडेल, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. त्यावर मी वर्षातील 365 दिवस गोडच बोलत असते, असं उत्तर त्यांनी दिलं.

पुण्याचे जिजापूर करावं, कुणी केलीय मागणी?

संभाजी ब्रिगेडच्या मागणीनंतर पुण्याचे जिजापूर असे नाव होणार का? अशी चर्चा होऊ लागली आहे. राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त संभाजी ब्रिगेडनं ही मागणी केली आहे. यापूर्वीही संभाजी ब्रिगेडने अनेकदा ही मागणी केली आहे.

राजमाता जिजाऊंनी पुन्हा पुणे वसवलं आणि पुणे हे शहर माँसाहेब जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे जिजापूर असे नाव करावे, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

दिवाळीपूर्वी यमराजांसाठी दिवा कधी आणि कसा लावावा?

Maharashtra Live News Update : नारायणपूरच्या पोलीस अधीक्षकांसमोर १६ माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण

Metro Line 7A च्या बोगद्याचे काम पूर्ण, थेट विमानतळावर पोहोचता येणार; २ तासांचा प्रवास ४० मिनिटात

Shweta Tiwari: वयाची चाळीशी ओलांडली तरी दिसतेय चिरतरुण; श्वेता तिवारीचं फिटनेस रुटीन काय?

शरीरात 'हे' बदल दिसले तर दुर्लक्ष करू नका; असू शकतात गंभीर आजार

SCROLL FOR NEXT