Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : पत्नीच्या भावाने तरुणाला अडकवले जादूटोण्यात; ज्‍योतिषाच्‍या माध्‍यमातून लुटले २८ लाख रुपये

पत्नीच्या भावाने तरुणाला अडकवले जादूटोण्यात; ज्‍योतिषाच्‍या माध्‍यमातून लुटले २८ लाख रुपये

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : पुण्यातील विश्रांतवाडी भागात धक्कादायक घटना समोर आली आहे. शिक्षणाच्या माहेर घरात जादूटोण्याचे खेळ सुरू (Pune) असल्‍याचे पहावयास मिळाले आहे. यात सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्‍या तरूणाला जादूटोण्यात (witchcraft) अडकवून २८ लाख रूपये लुटल्‍याचा प्रकार समोर आला आहे. (Latest marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार हा सर्व प्रकार पुण्यातील एका नामांकित कंपनीमध्ये काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनियर यांच्या संदर्भात घडला. घरात विघ्न आले आहे. घरातील समस्या दूर करण्यासाठी धार्मिक विधी कराव्या लागतील. तसेच शारीरिक दोष दूर करण्यासाठी जादूटोणा करावा लागेल; असे सांगून पत्नीच्या भावानेच त्या तरुणाला तब्बल २८ लाखांना गंडा घातला आहे.

अन्‌ सोने घेऊन झाला पसार

फिर्यादी हे एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. त्यांना घरात काही समस्या जाणवत होत्या. त्याचाच गैरफायदा घेत पत्नीच्या भावाने ओळखीचा एक ज्योतिष असल्याचे सांगत त्यांना बोलून घेतले. त्या ज्योतिषने फिर्यादी यांच्या हस्तरेषा बघुन कणकेचे पुतळे तयार करून लाखो रुपयांचे सोने चढवून मठात पूजा करावे लागेल; अशी बतावणी करून ते सोने घेऊन पसार झाला. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शेतकऱ्यांचा बाप काढला म्हणून कानाखाली जाळ काढला; 'स्वाभिमानी'च्या जिल्हाध्याक्षाने बँक मॅनेजरच्या कानाशिलात लगावली Video Viral

School Closed: यवतमाळ जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी; काय आहे कारण?

70 नगरसेवकांचं गुवाहाटीत कुटुंबीयांसह प्रशिक्षण,उल्हासनगर महापालिकेची 65 लाखांची उधळपट्टी, जनतेच्या पैशांवर काय झाडी काय डोंगर?

6 कोटींचा रस्ता महिन्याभरातच उखडला, कंत्राटदार-अधिकाऱ्यांचा टक्केवारीचा झोल, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेची पोलखोल

हॉकीच्या भगव्या जर्सीवरून वाद, जर्सीच्या रंगावरून राजकारण तापलं

SCROLL FOR NEXT