Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : जुलूसमध्ये झेंडा फडकवताना विजेचा झटका, शॉक लागून २ तरुणांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा VIDEO

Pune News : पुण्यातील वडगाव शेरी परिसरात आज सकाळी साडे अकराच्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस काढण्यात आला होता.

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 
पुणे
: मोहम्मद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस (मिरवणूक) काढण्यात आला होता. यावेळी रथावर चढून झेंडा फिरवणाऱ्या दोन तरुणांचा विजेचा जोरदार धक्का लागल्याची घटना घडली होती. यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. 

पुण्यातील (Pune) वडगाव शेरी परिसरात आज सकाळी साडे अकराच्या पैगंबर जयंतीच्या निमित्ताने जुलूस काढण्यात आला होता. यावेळी साऊंड सिस्टीमवर उभा राहून दोन तरुण झेंडा फिरवत होते. दरम्यान, झेंडा फिरवताना त्या ठिकाणाही असलेल्या उच्चदाब विजेच्या तारांना झेंडा लागला आणि त्याचा झटका या दोघा तरुणांना बसला. (Electric Shock) विजेचा जोरदार शॉक लागटाच काही क्षणातच ते जमिनीवर कोसळले. यापैकी एका तरुणाच्या जागीच मृत्यू झाला.  

दुसऱ्याचाही मृत्यू 

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील जखमी तरुणाला लागलीच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा देखील उपचारादरम्यान दुपारी मृत्यू झाला, जकरिया बिलाल शेख आणि अभय वाघमारे अशी या घटनेत मृत झालेल्या दोन्ही तरुणांचे नवे आहेत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत शिंदेंची मोठी घोषणा, मुख्यमंत्र्यांसमोरच स्पष्ट केली भूमिका

इंजिनिअरसह अख्ख्या कुटुंबाची गोदावरी नदीत उडी; 5 जणांच्या हत्येप्रकरणी कोचला अटक

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Prajakta Mali Photos: प्राजक्ता माळीचे टॉप 10 फोटो, जे तुम्ही कधीच पाहिले नसतील

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

SCROLL FOR NEXT