Pune Accident Saam tv
महाराष्ट्र

Pune Accident : भरधाव डंपरने दुचाकीस्वाराला चिरडले; पुणे- नगर महामार्गावर भीषण अपघात

Pune News : नेहमीप्रमाणे चैतन्य हा आपल्या दुचाकीवर सकाळी साडे सहा वाजता खराडीतील कंपनीत जाण्यासाठी निघाला. दरम्यान घरापासून निघून काही वेळातच त्याचा अपघात झाला

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 
पुणे
: कामावर जाणाऱ्या तरुणावर पहाटेच्या सुमारास काळाने घाला घातला. पुणे- नगर महामार्गावरून दुचाकीवरून जात असताना भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार तरुण चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी दाखल करण्यासाठी नेले असता तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.

पुणे- नगर महामार्गावरील वाघोली (Pune) परिसरात आज सकाळी अपघात घडला आहे. या अपघातात चैतन्य उमेश शिंदे असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चैतन्य शिंदे हा खराडी येथे एका कंपनीत काम करत होता. नेहमीप्रमाणे चैतन्य हा आपल्या दुचाकीवर सकाळी साडे सहा वाजता खराडीतील कंपनीत जाण्यासाठी निघाला. दरम्यान घरापासून निघून काही वेळातच त्याचा अपघात झाला. पुणे- नगर महामार्गावर रिलायन्स मार्ट समोर डंपरने त्याला (Accident) धडक दिली. 

भरधाव वेगाने आलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने तो खाली फेकला जाऊन डंपरच्या मागील चाकाखाली आला. यात तो गंभीर जखमी झाला होता. यानंतर त्याला तात्काळ ससून रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दरम्यान अपघातानंतर डंपर चालक घटनास्थळावरून पसार झाला आहे. पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: पुण्यात फायनान्स कंपनीविरोधात शिंदेसेना आक्रमक, शेतकऱ्याच्या घराचं सील तोडलं

Train Accident: २ प्रवासी ट्रेनची एकमेकांना धडक, आतापर्यंत ४ प्रवाशांचा मृत्यू; ८८ जण गंभीर जखमी

Monday Horoscope: या राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल! कोणाला मिळणार पैशांचा लाभ? वाचा राशिभविष्य

Weight Loss Tips : वजन कमी करण्याचं सिक्रेट; 5 पदार्थ दररोजच्या आहारातून करा हद्दपार

Khan Saree Designs: महिलांसाठी खणाच्या साड्यांच्या लेटेस्ट डिझाईन्स, हे 5 पॅटर्न्स दिवाळीत दिसतील उठून

SCROLL FOR NEXT