Rajgad Fort Saam tv
महाराष्ट्र

Rajgad Fort : राजगड किल्ल्यावर रात्रीत उभारला शिवाजी महाराजांचा पुतळा; पुरातत्व विभागाकडून पुतळा हटवत साहित्य जप्त

Pune News : राजगड किल्ला पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली असलेले एक ऐतिहासिक स्मारक आहे. त्यामुळे याठिकाणी कोणतेही बांधकाम किंवा बदल करण्यास कठोर निर्बंध असताना विना परवानगी पुतळा एका रात्रीत बसविण्यात आला

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे : पुण्यातील राजगड किल्ल्यावर काही बांधकाम करण्यास किंवा बदल करण्यास मनाई आहे. असे असताना देखील एका शिवप्रेमी संघटनेकडून विना परवानगी एका रात्रीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे. पुतळा बसविण्याबाबत पोलिसांना माहिती मिळताच याठिकाणी पोलिसांनी हा पुतळा हटवून पुरातत्व विभागाने सर्व साहित्य जप्त केले आहे. 

राजगड किल्ला हा पुरातत्व विभागाच्या संरक्षणाखाली असलेले एक ऐतिहासिक स्मारक आहे. त्यामुळे याठिकाणी कोणतेही बांधकाम किंवा बदल करण्यास कठोर निर्बंध आहेत. ऐतिहासिक स्मारक असताना देखील विना परवानगी हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा एका रात्रीत बसविण्यात आला आहे. या प्रकाराबाबत आज सकाळी माहिती पोलिसांपर्यंत पोहचली. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये आणि शिवप्रेमींमध्ये चर्चा सुरू झाली आहे. 

पुतळा हटवत साहित्य जप्त 

दरम्यान किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजसदरेच्या परिसरात एका रात्रीत मेघडंबरी उभारून त्यामध्ये महाराजांचा पुतळा बसवून पूजा करण्यात आली आहे. पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच ही माहिती राजगड तालुक्यातील वेल्हे पोलिसांना कळविण्यात आली. या नंतर पोलिसांनी गडावर जात पुतळा हटविला. तसेच मेघडंबरी काढून साहित्य जप्त केले. पुरातत्व विभागाच्या सतर्कतेमुळे काही तासातच हे साहित्य जप्त झाले आहे. 

वेल्हा पोलिसात होणार गुन्हा दाखल 

दरम्यान या प्रकारामुळे पुरातत्व विभागाने याप्रकरणी कठोर पावले उचलण्याचे संकेत दिले असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी किल्ल्यावरील सुरक्षा वाढवण्याचा विचार सुरू आहे. तर समस्त हिंदू बांधव संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र पडवळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून हा अनधिकृत पुतळा उभा करण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. तर अनधिकृत पुतळा बसवल्याप्रकरणी राजगडमधील वेल्हा पोलीस स्टेशनंमध्ये गुन्हा दाखल करण्याचे कामं सुरू आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure Foods: ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यासाठी हे 5 पदार्थ जरूर खा, हार्ट देखील राहिल हेल्दी

Fake Baba: दारू सोडायला गेला, बाबाने धू धू धुतलं; VIDEO व्हायरल

Matka King Review : विजय वर्माचा 'मटका किंग' पास की फेल? प्रेक्षकांना कसा वाटला?

Kalyan Tourism : प्राचीन भिंती अन् भक्कम दरवाजे, कल्याणमधील 'हा' किल्ला जपतोय ऐतिहासिक वारसा

Ladki Bahin Yojana: उरला फक्त शेवटचा आठवडा! लाडक्या बहिणींनो आताच eKYC करा, अन्यथा ₹१५०० कायमचे बंद होणार; प्रोसेस वाचा

SCROLL FOR NEXT