Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला ओटीपी शेयर घोटाळा; पुण्यातील तरुणाला अटक

पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला केला ओटीपी शेयर; पुण्यातील तरुणाला अटक

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या हस्तकांना ओटीपी शेयर केल्याच्या घोटाळ्यात कथित सहभागाबद्दल पुण्यातील (Pune) तरुणाला अटक केली आहे. अभिजीत संजय जांबुरे असे या संशयित तरुणाचे नाव असून ओडिशा पोलिसांच्या (Police) स्पेशल टास्क फोर्सने पुण्यातून या तरुणाला अटक केली आहे. (Live Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार अभिजित जांबुरे हा मूळचा सातारा जिल्ह्याचा आहे. पुण्यातील एका नामांकित आयटी कंपनीत तो कार्यरत होता. त्याला पुण्याच्या स्थानिक न्यायालयात हजर करून भुवनेश्वरला नेण्यात आले आहे. घोटाळ्यातील आरोपी एखाद्या व्यक्तीच्या नावावर ॲक्टिव्हेट न झालेले सिमकार्ड घेत असतो. त्याद्वारे ओटीपी तयार करून डिजिटल वॉलेटला एक हजार ते ३० हजार रुपयांना विकतो. अशा प्रकारे सायबर गुन्हेगारांना हजारो ओटीपी शेअर केल्याची माहिती तपासात समोर आली आहे.

पाकिस्‍तान व नायजेरीयन नागरीकांच्‍या संपर्कात

दोन पाकिस्तानी आर्मी इंटेलिजन्स अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. तसेच त्याने प्री-ॲक्टिव्हेटेड सिमकार्डद्वारे तयार केलेले ओटीपी सायबर गुन्हेगारांना विकले गेले होते. तसेच, पाकिस्तानमधील गुप्तचर अधिकाऱ्यांना फेसबुकद्वारे ओटीपी शेअर केला. तसेच तो व्हॉट्सॲपद्वारे पाकिस्तानी आणि नायजेरियन नागरिकांच्या संपर्कात असल्याचे ‘एसटीएफ’ने पत्रकात म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नसरापूरातील हत्या आणि अत्याचाराची घटना एक क्रूरतेचा कळस आहे- कोर्ट

लाल, पिवळी की हिरवी? वटपौर्णिमेला कोणत्या रंगाची साडी नेसणं शुभ

Nasrapur Case Verdict : नसरापूर अत्याचार प्रकरणात कोर्टाने दिला निकाल, नराधम भीमराव कांबळे अखेर दोषी

Nasrapur Case : नसरापूरच्या नरकासुरला फाशी की जन्मठेप? न्यायालयाच्या निकालाकडे राज्याचे लक्ष, घटनेची A to Z टाईमलाईन

Mawa kachori: घराच्या घरी कशी तयार कराल राजस्थानची मावा कचौरी?

SCROLL FOR NEXT