Pune Police Saam tv
महाराष्ट्र

Pune Police : वेगवेगळ्या राज्यात जाऊन घरफोडी; अट्टल चोरटा १६ लाखाच्या मुद्देमालासह ताब्यात

Pune News : गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यात घरफोडी केल्या आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील भोर शहरातील घरफोडी केली होती. या घरफोडीचा तपास केला जात असताना लखन यास पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

सचिन जाधव, साम टीव्ही प्रतिनिधी
पुणे
: चोरीच्या गुन्ह्यात शिक्षा भोगल्यानंतर पुन्हा घरफोडी करण्याचे सातत्याने सुरु होते. प्रामुख्याने वेगवेगळ्या राज्यात जाऊन घरफोडी करणारा हा सराईत चोरटा पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून तब्बल १६ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तर त्याच्यावर तब्बल ५० गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 

लखन अशोक कुलकर्णी उर्फ सचिन राजू माने मूळचा राहणार सोलापूर असे ताब्यात घेतलेल्या चोरट्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या आरोपीवर जवळपास ५० पेक्षा अधिक घरफोडी आणि इतर प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यात घरफोडी केल्या आहेत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील भोर शहरातील घरफोडी केली होती. या घरफोडीचा तपास केला जात असताना लखन यास पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. 

सात वर्षाची भोगलीय शिक्षा 

दरम्यान आरोपी एकटाच चोऱ्या करून आलिशान गाडीमधून वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असे. तर लखन याने अगोदर कर्नाटक राज्यात चोरी केल्यानंतर सात वर्षाची शिक्षा भोगून बाहेर पडला आहे. त्यानंतर काही महिन्यापूर्वी तो सातारा पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्यात अटक होता. त्यातूनही त्याला जामीन मिळाला होता. त्यानंतर आरोपीने भोर शहरात घरफोडी केली होती.

१६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत 

घराचा कडी कुलूप तोडून तो घरफोडी करत होता. अशाच प्रकारे भोरमध्ये एका घरातून सोन्या- चांदीचे दागिने रोख रक्कम असा २६ लाख ८७४ रुपयाचा मुद्देमाल लंपास केला होता. याचा तपास करत पुणे ग्रामीण पोलिसांनी साडेआठ तोळे वजनाची सोन्याचे दागिने, दोन किलोग्रॅम वजनाची चांदीची भांडी, रोख रक्कम, कार असा १६ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच या आरोपींनी अशा प्रकारच्या अजून कुठे घरफोड्या किंवा इतर चोऱ्या केल्या आहेत का? याचा तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात गॅस धारकांना फटका

Edible Oil Price Hike: युद्धामुळे सर्वसामान्यांच्या घरात उडाला भडका, खाद्यतेलाच्या किंमतीत १२५ रुपयांनी वाढ

Taak Masala Recipe: ताक बनवण्याचा मसाला घरी कसा बनवायचा?

Viral Video: भर रस्त्यात रेड्याचा उच्छाद; स्कूटीस्वाराला हवेत उचलून आपटलं, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल थक्क

Siddharth Chandekar: सिद्धार्थ चांदेकरला महानगर गॅसच्या नावाने आला फ्रॉड कॉल; अभिनेत्याने कॉलरला म्हणायला लावली मराठी कविता

SCROLL FOR NEXT