Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : पुण्यात विजयासाठी महायुतीची रणनीती ठरली; मित्र पक्षाला एकत्र घेत बांधली समन्वयाची मोट

Pune News : महाविकास आघाडी व महायुती यांची प्रमुख लढत असली तरी बंडखोरी व फुटणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळे कोणत्या पक्षाला फायदा व कोणत्या पक्षाला नुकसान हे सांगणे कठीण

Rajesh Sonwane

सचिन जाधव 
पुणे
: पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीतील प्रमुख चार पक्षांसह १५ पक्षांची समन्वयाची मोट बांधण्यात आली आहे. मानापमानावरून होणारे रुसवे- फुगवे, गैरसमज टाळून एकत्रितपणे समन्वयाने विधानसभा निहाय प्रचार करण्यावर महायुतीने भर दिला आहे.

यंदा होत असलेली विधानसभा निवडणूक अतिशय चुरशीची होण्याची शक्यता वळविली जात आहे. महाविकास आघाडी व महायुती (Mahayuti) यांची प्रमुख लढत असली तरी बंडखोरी व फुटणाऱ्या पदाधिकाऱ्यांमुळे कोणत्या पक्षाला फायदा व कोणत्या पक्षाला नुकसान हे सांगणे कठीणच आहे. त्यानुसार (Pune News) पुणे शहरातील आठ विधानसभा मतदारसंघापैकी सहा ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत. तर दोन ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. त्यांना निवडून आणण्यासाठी मित्र पक्ष सोबत आले आहेत. 

योग्य पद्धतीने समन्वय ठेवण्यावर भर 
महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं आठवले गट, लहूजी शक्ती सेना, अखिल भारतीय मराठा महासंघ, युवा स्वाभिमानी पक्ष, जनसुराज्य पक्ष, रयत क्रांती सेनेसह सुमारे १५ पक्षांचा समावेश आहे. महायुतीतील कोणत्याही पक्षाचे, पदाधिकाऱ्याचे मन दुखावले जाणार नाही. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह अन्य घटक पक्षांमध्ये महायुती म्हणून योग्य पद्धतीने समन्वय ठेवला जात आहे. प्रचार फेरी, सभा, मेळावे, बैठकांमध्ये सर्वांना सामावून घेतले जात आहे. पदाधिकारी, कार्यकर्ते एकमेकांच्या संपर्कात आहेत.

अशी आहे रणनीती...
- महायुतीतील प्रत्येक पक्षाला मेळावा घेण्याचे स्वातंत्र्य. त्यासाठी प्रचार साहित्य पुरविले जात आहे.
- स्वतःच्या पक्षाच्या विजयाच्या घोषणा देण्याऐवजी ‘महायुतीचा विजय असो’ ही घोषणा दिली जात आहे. त्यामुळे घटक पक्षांमध्ये एकी दिसून येईल, याची काळजी घेतली जात आहे.
- प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महायुतीची संयुक्तपणे महिला आघाडीची बैठक व युवकांचे मेळावे, रॅली काढली जात आहे.
- प्रत्येक पक्षाचे शहराध्यक्ष व पदाधिकारी वैयक्तीक संपर्कात आहेत. त्यामुळे आठही मतदारसंघात नियोजन होत आहे.
- एकसंध प्रचारासाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याला व्यवस्थित निरोप देणे, ज्या ठिकाणी नाराजी, कुरबुरी आहे तेथे महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संवाद घडवून आणला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dombivli : डोंबिवलीतील 29 कुटुंबांची चिंता वाढली! इमारत रिकामी करण्याची नोटीस, रहिवाशांची केडीएमसीत धाव

MPSC News : एमपीएससी भरती प्रक्रियेत मोठे बदल; उमेदवारांसाठीचे २ पर्याय रद्द करण्याचा निर्णय

Baramati Plane Crash: बारामती विमान अपघाताचा थरकाप उडवणारा VIDEO समोर

शाळेत जाताना भटक्या कुत्र्याच्या जीवघेणा हल्ला; चेहऱ्यावर पडले ८० टाके, उपचारादरम्यान ९ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Glowing Skin Tips: 7 दिवसांत चेहरा होईल चमकदार, हे स्किनकेअर लगेचच करा फॉलो

SCROLL FOR NEXT