Pune Crime Saam TV
महाराष्ट्र

Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? कोयता गँगचा काँग्रेसच्या बड्या नेत्यावर जीवघेणा हल्ला, थोडक्यात जीव वाचला

Koyata Gang Attacks Congress Leader: हल्लेखोरांनी त्यांच्या दोन वाहनांचे मोठ नुकसान केले.

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

Pune News: पुण्यात एका काँग्रेस नेत्यावर हल्ला करण्यात आला आहे. पुण्यातील सासवड येथे माजी नगरसेवक आणि सध्याचे काँग्रेस नेते गणेश जगताप. यांच्यावर जीवघेणा हल्ल झाल्याचा प्रकार उघडकीस आलाय. याबाबत जगताप त्यांनी पाच हल्लेखोरांच्या विरोधात सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे. (Latest Pune Crime)

शहरातील अवैध व्यवसायाबद्दल केलेल्या तक्रारीवरून हा हल्ला केल्याचं त्यांनी म्हटलंय. जगताप यांच्या इमारतीच्या पार्किंगमध्ये घुसून हातात कोयाते घेऊन त्यांना मारण्याचा प्रयत्न केलाय. मात्र जगताप कारमध्येच बसून राहिल्याने ते बचावले.

यावेळी हल्लेखोरांनी त्यांच्या दोन वाहनांचे मोठ नुकसान केले. सासवडमध्ये मागील काही काळापासून कोयता गँगने दहशत निर्माण केलीय. या कोयता गँगचा बीमोड करण्याचं मोठ आव्हान पोलिसांसमोर उभं राहीलंय.

कोयता गँगमुळे आतापर्यंत काही व्यक्ती जखमीही झाल्या आहेत. गेल्या महिन्यात कोयता गँगच्या काही व्यक्तींना पोलिसांनी अटक केली. मात्र या संपूर्ण टोळीला शोधण्याचं मोठं आव्हान आहे. काही दिवासंपूर्वी कोयता गँगला कोयते पुरवणाऱ्या दुकानदाराचा देखील शोध लागला होता. तसचे कोयता खरेदीसाठी इथून पुढे आधार कार्ड जमा दाखवणे अनिवार्य करण्यात आले. मात्र आजूनही अनेक टवाळ मुलं अशा पद्धतीने दहशत पसरवताना दिसत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Oppo Find X9: भारतात २०० एमपी कॅमेरासह 'हा' नवीन फोन होणार लाँच, कंपनीने दिली ९९ रुपयांची खास ऑफर

Samantha Ruth Prabhu: साऊथ अभिनेत्री समांथाने कथित बॉयफ्रेंडसोबतचा फोटो केला पोस्ट, फोटोंवर लाईक्सचा होतोय वर्षाव

४ नवीन वंदे भारत धावणार! PM नरेंद्र मोदींकडून हिरवा कंदील, वाचा थांबे अन् वेळापत्रक

Fake Currency Scam : धक्कदायक! पैसे दुप्पट करून देतो सांगायचा, खऱ्या पैशांऐवजी द्यायचा खेळण्यातील नोटा, नेमकं प्रकरण काय?

Nashik : नाशिककरांनो पाण्याचा जपून वापर करा, शहरातील 'या' भागात आज पाणी नाही | VIDEO

SCROLL FOR NEXT