Pune Crime News Saam Tv
महाराष्ट्र

Pune Crime News: सुक्क चिकन नाही, बिर्याणी मिळते...; सुक्क चिकन न दिल्याने ग्राहकाकडून हॉटेल मालकाला लोखंडी रॉडने मारहाण

हॉटेलमध्ये दिलेली ऑर्डर उपलब्ध नसल्याने तीन टवाळ मित्रांनी तुफान राडा घातला.

साम टिव्ही ब्युरो

रोहिदास गाडगे

Pune Crime News: पुणे शहर तसेच गाव परिसरात देखील हाणामारीच्या घटनांचे प्रमाण वाढत चालले आहे. पुण्यातल्या राजगुरुनगर परिसरात अशीच एक घटना घडली आहे.हॉटेलमध्ये दिलेली ऑर्डर उपलब्ध नसल्याने तीन टवाळ मित्रांनी तुफान राडा घातला आहे. यात त्यांनी हॉटेलचे नुकसान करत हॉटेल मालकासह अन्य दोघांनी बेदम मारहाण केली आहे. (Latest Pune News)

मिळालेल्या माहितीनुसार, राक्षेवाडीत बिर्याणी हाऊस येथे ही घटना घडली आहे. तीन टवाळ मित्र या हॉटेलमध्ये गेले होते. त्यावेळी त्यांनी सु्क्क चिकन ऑर्डर केलं. मात्र हॉटेलमध्ये सुक्क चिकन नव्हतं त्यामुळे ते मिळणार नाही असं वेटरणे सांगितलं. बिर्याणी हाऊसमध्ये येऊन सुक्क चिकन मिळणार नाही याचा त्या तीन मित्रांना खूप राग आला. त्यामुळे त्यांनी हॉटेलमालकाला या विषयी सांगितले.

मात्र सुक्क चिकन बनवण्यासाठी लागणारं चिकनचं हॉटेलमध्ये नव्हतं त्यामुळे हॉटेल मालकाने देखील नकार दिला. यावर तिन्ही मित्र खुप चिढले. त्यांनी बिर्याणी हाऊस मालकासह एकाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ करत हॉटेलचेही नुकसान केले. या घटनेमुळे संबंधित हॉटेल मालकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच बेदम मारहाण केल्या प्रकरणी राजगुरुनगर पोलीसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT