Accident In Pune saam tv
महाराष्ट्र

Accident News: रात्रीच्या अंधारात जीपने 8 जणांना चिरडले, भीषण अपघातात दोन चिमुकल्यासह 5 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Junnar Apghat News: पुण्याच्या जुन्नरमध्ये रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींसह 8 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> रोहिदास गाडगे

Accident In Pune : पुण्याच्या जुन्नरमध्ये रात्रीच्या अंधारात पिकअप जीपने दोन दुचाकींसह 8 जणांना चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात दोन चिमुकल्यांसह 5 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 3 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मिळतेय.

नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडीत येथे हा भीषण अपघात झाला आहे. रात्रीच्या अंधारात भरधाव पिकअप जीपने दोन दुचाकीना उडवले. या अपघातात आठ जण चिरडले गेले. यातील 5 जणांचा मृत्यू झाला आहे, मृतांमध्ये दोन चिमुकल्यांचा समावेश आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात दुचाकीवरून जाणारे प्रवाशी हे शेतमजूर होते. हे सर्व शेतमजूर नारायणगाव येथुन शेतातील कामे आटोपून पारनेर तालुक्यातील पळशी वनकुटे येथे घराकडे जात होते. या दरम्यान नगर-कल्याण महामार्गावर लवणवाडी येथे पिकअप जीपने दुचाकीवरून जाणाऱ्या आठ जणांना चिरडल्याची घटना घडली. (Pune News)

या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते आहे. यामध्ये एका चिमुकल्यांसह एका व्यक्तीचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान तीन जाणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन चिमुकले, दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे.

मृतांमध्ये सुंदराबाई (वय २८ वर्षे), गौरव मधे (वय ५ वर्षे), नितीन मधे (वय २५ वर्षे) यांच्यासह एका लहान मुलाचा समावेश आहे. मृतांपैकी एकाचे नाव अद्याप समजू शकलेले नाही. तर अर्चना मधे आणि सुहास मधे असे गंभीर असलेल्या दोन प्रवाशांची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, या भीषण अपघातात तीनही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यातील पिकअप जीपचा चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तात्काळ याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान अपघातातील जखमी प्रवाशांना उपचारासाठी खाजगी रुग्णालायात दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पावसाळ्यात बनवा चटपटीत टोमॅटो चीज चटणी पकोडा; एकदा खाल्लं की खातच राहाल|Tomato Cheese Chutney Pakoda

Chanakya Niti: राग संपवू नका, त्यावर नियंत्रण ठेवा; चाणक्यांनी यश मिळवण्यासाठी दिला मोलाचा सल्ला

Maharashtra News Live Update: पुणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट; पुढील तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा

Paneer Puff Recipe: घरच्या घरी बनवा खुसखुशीत पनीर पफ; चहासोबत लागेल भन्नाट चव

महावितरणचा हलगर्जीपणा! विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

SCROLL FOR NEXT