IPL Cricket Betting Saam tv
महाराष्ट्र

IPL Cricket Betting: आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा; बेटिंग करणाऱ्या ६ बुकी पोलिसांच्‍या ताब्‍यात

आयपीएल क्रिकेट सामन्यांवर सट्टा; बेटिंग करणाऱ्या ६ बुकी पोलिसांच्‍या ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : इंडियन प्रीमीअर लिग (आयपीएल) अंतिम टप्‍प्‍यात आली आहे. यामुळे आता प्रत्‍येक सामन्‍यांवर ऑनलाईन सट्टा (Online Betting) खेळला जात आहे. यात पुणे येथे सुरू असलेल्‍या सट्ट्यावर (Pune) पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेतील सामाजिक सुरक्षा विभागाकडून छापा टाकत कारवाई करण्यात आली. यात सहा बुकींना पोलिसांनी ताब्‍यात घेतले आहे. (Maharashtra News)

आयपीएल (IPL) क्रीकेट मॅचवर सट्टा (IPL Betting) लावला जात आहे. यात पुण्यातील खराडी परिसरात बंद फ्लॅटमध्ये आयपीएल क्रिकेट मॅचवर बेटिंग घेत होते. वेबसाईटचा वापर करून सध्या भारतात सुरु असलेल्या टाटा आयपीएल २०२३ च्या मुंबई इंडीयन्स व लखनौ सुपर जायंट्स या लाईव्ह क्रिकेट सामन्यांवर ऑनलाईन क्रिकेट बेटींग करीता ग्राहकांना बेकायदेशरपणे लॉगीन आयडी पासवर्ड देवुन त्या बदल्यात क्रिकेट बेटींग करत होते.

बेटींग करणारे अन्‍य राज्‍यातील

पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. त्‍यानुसार पोलिसांनी छापा टाकत सगळ्यांना अटक करण्यात आली. हे सर्व बुकी छत्तीसगड, पंजाब आणि बिहारमधील आहेत. गौरव धरमवानी, सुनिश लखवानी, जपजितसिंह बग्गा, जसप्रीत सिंह, तरणदिप सिंह, लालकिशोर राम असे आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून लॅपटॉप, मोबाईल आणि वायफाय राउटर असा माल जप्त करण्यात आला आहे. पुण्यातील आयपीएल सामन्यांवर बेटिंग करणाऱ्याच्या विरोधात दुसरी मोठी कारवाई आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: मनविसे च्या 2 कार्यकर्त्यांना पुणे पोलिसांकडून अटक

Badshah Divorce : बॉलीवूडमध्ये पुन्हा खळबळ! 'या' प्रसिद्ध रॅपरने घेतला ५ महिन्यातच घटस्फोट; ईशा रिखीसोबत नाते संपले

Gold Price Today : महिन्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर बदलले, वाचा तुमच्या शहरातील 24k, 22k, 18k चे लेटेस्ट रेट्स

अमित ठाकरेंवरील गुन्ह्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई! मध्यरात्री २ नेत्यांना ठोकल्या बेड्या, राजकारणात खळबळ

Operation Tiger: मोठी बातमी! नवरात्रीआधी ठाकरेंचे १४ आमदार फुटणार, शिंदेसेनेत प्रवेश करणार?

SCROLL FOR NEXT