Pune Nashik Highway Accident Saamtv
महाराष्ट्र

Pune Nashik Highway Accident: पुणे- नाशिक महामार्गावर भीषण अपघात! मोठी वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा

Pune Nashik Highway Traffic Update: अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच वाहने हटवण्याचे काम सुरू आहे.

रोहिदास गाडगे

Pune Nashik Highway Traffic Jam: पुणे नाशिक महामार्गावरून एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे नाशिक महामार्गावर चांडोली टोलनाक्यावर तीन मालवाहू वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामुळे महामार्गावर भीषण वाहतूक कोंडी झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावर (Pune- Nashik Highway) चांडोली टोलनाक्यावर तीन मालवाहू वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला. दूध वाहतूक करणाऱ्या दोन ट्रकमध्ये हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात दोन्ही वाहन चालक गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नजिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातामुळे महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली असून नाशिककडे जाणाऱ्या वाहनांच्या चार- पाच किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या आहेत. या अपघाताची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच वाहने हटवण्याचे काम सुरू आहे...

मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प

गेल्या आठवडाभरापासून मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशातच मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळण्याची घटना घडली आहे. महामार्गावरील निवळी घाटात दरड कोसळली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाल्याची माहिती आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar Tourism : २०० रूपयात वीकेंड करा एन्जॉय, पालघरमधील 'या' ठिकाणांना भेट द्याच

IPL मध्ये खेळू दिले नाही, RCB चा स्टार खेळाडू थेट कोर्टात गेला; नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : पुण्यात पालखी सोहळ्यावर मधमाश्यांचा हल्ला; ६५ जण जखमी

KDMC : केडीएमसीमधील धक्कादायक प्रकार उघड, महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याचा आरोप; वरिष्ठ लिपिक निलंबित

Chanakya Niti: नोकरीत यश मिळवायचंय? चाणक्यांचे हे अनमोल विचार नक्की वाचा, मिळेल घवघवीत यश

SCROLL FOR NEXT