Mundhwa local bar Fight Video  SaamTV
महाराष्ट्र

Pune Crime: मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यावरुन दोन गटांमध्ये राडा, पुणे पोलिसांचा बारबाबत मोठा निर्णय | Video

Pune Local Bar Fight Video: शनिवारी १ फेब्रुवारी रोजी पुण्यातील एबीसी रोड, मुंढवा येथे असलेल्या हॉटेल 'लोकल बार'मध्ये दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : मोबाईलमध्ये व्हिडीओ काढण्याच्या वादातून मुंढवा येथील 'लोकल बार'मध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता आणि या हाणामारीचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले होते. हाणामारी करणाऱ्या दोन्ही गटाविरुद्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने या बारचा खाद्य परवाना देखील रद्द करण्यात आला आहे. त्याचदरम्यान, पुणे पोलिसांनी देखील एक धडक कारवाई केली आहे. पुणे पोलिसांकडून शहरातील 'लोकल बार' सील करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं?

शनिवारी १ फेब्रुवारी रोजी पुण्यातील एबीसी रोड, मुंढवा येथे असलेल्या हॉटेल 'लोकल बार'मध्ये दोन गटात हाणामारी झाली. या हाणामारीचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. पोलिसांनी या ठिकाणी केलेल्या चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी केली. त्यावरून दोन ग्रुपने एकमेकांना धक्काबुक्कीत करुन मारहाण केल्याचे निदर्शनास आले.

या घटनेबाबत तात्काळ राज्य उत्पादन शुल्क पुणे विभाग यांना माहिती देण्यात आली. त्यांनी हॉटेल 'लोकल बार' सील केलेलं आहे. अशा प्रकारची हॉटेल्स, बारमध्ये कायदा आणि सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होणारे वाद वारंवार होत असतील, तर संबधित हॉटेल, बार यांच्यावर परवाना रद्द करण्याची कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MLC Election: पुणे पदवीधर मतदारसंघात ट्विस्ट, भाजपने स्मिता जाधवांना उतरवलं; शरद लाडांच्या हालचालींनी राजकीय वर्तुळात खळबळ

Yellow teeth: दात रोज घासूनही पिवळे दिसतात? फक्त ब्रश करणं पुरेसं नाही; 'ही' कारणं असू शकतात

Maharashtra News Live Update : पुणे पदवीधर मतदार संघासाठी हर्षदा देशमुख यांनी उमेदवारी अर्ज केला दाखल

ST Pass Online: एसटीचा मोठा निर्णय! 'आवडेल तेथे प्रवास' पास आता २ मिनिटात, बसस्थानकावर जायची गरज नाही, A टू Z माहिती

Drishyam 3 Box Office Collection: विजय साळगावकरची चाहत्यांमध्ये क्रेझ, रविवारी 'दृश्यम ३'ने केली इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT