Pune Khed News Saam tv
महाराष्ट्र

Khed Crime : हॉटेलमध्ये हफ्तेखोरीसाठी गोळीबार; सलग दोन दिवस टोळीचा हैदोस

Pune Khed News : हप्ता देण्यास नकार दिल्याने गोळीबार करण्यात आला. सुदैवाने गोळी कोणाला लागली नाही. मात्र काठी व दांडक्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. तर वाहनांचे आणि हॉटेलमधील वस्तूंचे नुकसान

रोहिदास गाडगे

खेड (पुणे) : वाढती गुन्हेगारी हा चिंतेचा विषय बनला आहे. भर रस्त्यावर गोळीबार, शस्त्र घेऊन फिरत दादागिरी केली जात असते. असाच काहीसा खेड तालुक्यात समोर आला आहे. तालुक्यातील गोसासी गावात १० व ११ मे असे सलग दोन रात्री एकाच टोळीने हफ्तेखोरी करत मारहाण आणि गोळीबार केल्याच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे पोलीस प्रशासनाचा धाक संपला का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

खेड तालुक्यातील गोसासी या गाव परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. यात १० मेच्या रात्री अकरा वाजता हॉटेलमधील बिलाची मागणी केली. यावेळी अक्षय हजारे याने थेट बेल्ट काढून धमकी दिली. तर ११ मे रोजी मध्यरात्री भाऊ संदेश गोरडे व त्यांच्या नातेवाईकांवर जबरदस्तीने हप्ता मागणी केली. यास नकार दिल्याने त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. सुदैवाने गोळी कोणाला लागली नाही. मात्र त्यानंतर काठी व दांडक्यांनी मारहाण करून गोरडे यांना गंभीर जखमी केले. तर वाहनांचे आणि हॉटेलमधील वस्तूंचे देखील मोठे नुकसान केले.

आठ जणांवर गुन्हा दाखल 

दरम्यान हॉटेल व्यावसायिक निलेश गोरडे (वय ३२) यांच्या फिर्यादीवरून खेड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी संशयित आरोपी मयुर तानाजी हजारे, अक्षय बबन हजारे, मंगेश दौंडकर (सर्व रा. कन्हेरसर), गणेश दिलीप गोरडे (रा. गोसासी), बंटी डफळ (रा. धामारी) व चार अनोळखी इसम अशी या गुन्हेगारी टोळीची ओळख समोर आली आहे.

पोलिसांकडून कारवाई नाही 
या प्रकरणात गोळीबार, खंडणी, मारहाण, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे अशा गंभीर आरोपांखाली गुन्हा दाखल असून देखील पोलिसांनी या टोळीवर अद्याप ठोस कारवाई केली नसल्याचे दिसून येते. राजगुरुनगर विभागातील पोलीस प्रशासन गुन्हेगारी टोळीपुढे गुडघे टेकले आहे का? पोलिसांचा वचक उरलेला नाही का? असे प्रश्न आता निर्माण झाला आहे. तर घटनेचा सखोल तपास करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी होत आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Balushahi Recipe: सणासुदीला झटपट बनवा खुसखुशीत आणि पाकात मुरलेली बालूशाही, वाचा रेसिपी

Tomatoes for heart health: हृदयाच्या आरोग्यासाठी टोमॅटो फायदेशीर; पण कच्चा खावा की शिजवून? कार्डिओलॉजिस्टने दिलं उत्तर

Pitru Paksha 2026: श्राद्ध कसं करायचं? पितृ पक्षात कोणते विधी केले जातात? वाचा...

Maharashtra News Live Update: साहिल वाकोडे मृत्यू प्रकरण, चौकशी समितीने आणखी 8 आठवड्यांची मुदत मागितली

मनोज जरांगेंना मोठा झटका! निकटवर्तीयावर ४.९० कोटींचा दंड कायम

SCROLL FOR NEXT