gangster Gaja Marane Sent to Sangli jail Saam Tv News
महाराष्ट्र

Gaja Marne : मोठी बातमी! पुण्याच्या कुख्यात गुंड गजा मारणेला सांगली कारागृहात हलवलं, प्रशासनाचा कडेकोट बंदोबस्त

Gaja Marne Sent to Sangli Jail : कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याची सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सांगली कारागृहात त्याला नेण्यात आल्याने सांगली कारागृहाचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला.

Prashant Patil

पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यालयातील एकाला मारहाण प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई झालेला पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याला सांगलीच्या कारागृहात आणत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली. कोथरूड परिसरात गजा मारणेच्या टोळीतील गुंडांनी तरुण अभियंत्याला बेदम मारहाण केली होती. मकोका अंतर्गत कारवाई करत ३ मार्चपर्यंत गजा मारणेला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, आता एवढ्या मोठ्या गुंडाला सांगलीच्या कारागृहात का हलवले? याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे याची सांगली कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सांगली कारागृहात त्याला नेण्यात आल्याने सांगली कारागृहाचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला. सांगली कारागृह प्रशासनाकडून याबाबत गोपनीयता बाळगली असून खबरदारी म्हणून गजा मारणेची पुण्यातील येरवडा कारागृहाऐवजी सांगलीतील कारागृहात रवानगी केल्याची खात्रीलायक सूत्रांनी माहिती दिली आहे.

भाजप कार्यकर्त्याला कोथरूडमध्ये मारहाण केल्याप्रकरणी गजा मारणे याच्यावर मोकका लावण्यात आला होता. त्यानंतर पुणे पोलिसांनी त्याला अटकही केली होती. सांगली कारागृहात गजा मारणेची रवानगी करण्यात आली असून या कारागृहात चार बॅरॅक असून याच बॅरॅकमध्ये त्याला ठेवण्यात आलं आहे . त्याला ज्या कोठडीत ठेवण्यात आलं आहे त्याच्या बाहेर कडक बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. त्यामुळे कारागृह प्रशासन आता अलर्ट मोडवर आले असून कारागृहातील सर्व वॉट्स टॉवरवर बंदोबस्त आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heavy Rain : मुसळधार पाऊस; वारणा धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग, कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ

Kumbh Rashi : कुंभ राशीचा आजचा रविवार जाणार कसा? वाचा स्पेशल राशीभविष्य

Rohini Khadse: कोण आहे रोहिणी खडसे? जाणून घ्या त्यांच्याविषयी

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

7 minutes after death: मृत्यूनंतर 7 मिनिटांत काय घडतं? पाहा वैज्ञानिक दृष्टीकोनातून समोर आलेल्या धक्कादायक गोष्टी

SCROLL FOR NEXT