CM Devendra Fadanvis on Datta Gade  Saam TV News
महाराष्ट्र

Devendra Fadanvis : दत्ता गाडेचा बदलापूरचा अक्षय शिंदे होणार का? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले...

CM Devendra Fadanvis on Datta Gade Encounter : आता यावर बोलणं खूप लवकर बोलण्यासारखं होईल. आता पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. आज कस्टडी मिळेल त्यानंतर चौकशी होईल.

Prashant Patil

मुंबई : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये २६ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. बस स्थानकामध्ये सकाळी पहाटेला दत्ता गाडे या नराधमाने शिवशाही गाडीमध्ये नेत अतिप्रसंग केला होता. या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांना तीन दिवस लागले. पोलिसांना गुंगार देणाऱ्या दत्ताला तीन दिवसांनी अटक करण्यात आलीय. शिरूर येथील गुनाट गावच्या शिवारात त्याला अटक झाली. या अटकेनंतर त्याला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

तंत्रज्ञानाचा वापर करून पोलिसांनी आरोपीला शोधून काढलं आहे. लवकरच या घटनेचा पर्दाफाश होईल. त्यासंदर्भात काही माहिती पोलीस आयुत्तांनी दिली आहे. काही माहिती यावेळी देणं योग्य नाही. घटनेचा नेमका घटनाक्रम काय हे योग्य वेळेला तुमच्यापर्यंत पोहोचेल. यावेळी दत्ता गाडेसोबत अक्षय शिंदेसारखी पुनरावृत्ती होणार का? असा प्रश्न विचारला असता, यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, आता यावर बोलणं खूप लवकर बोलण्यासारखं होईल. आता पोलिसांनी आरोपीला पकडलं आहे. आज कस्टडी मिळेल त्यानंतर चौकशी होईल. काही तांत्रिक आणि फॉरेन्सिक माहिती समोर आली त्या एकत्रित करून यावर बोलणं योग्य राहिलं, असं देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितलं.

योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीने घेतलं गेलं. म्हणजे माझा असा समज आहे की ते सांगण्याचा प्रयत्न करत होते की, हा लोकं असलेला परिसर असून बस काही आतमध्ये नव्हती, बाहेरच होती. लोकांना प्रतिकारा होताना लक्षात आलं नाही. तथापि ते नवीन आहे युवा मंत्री असून, काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायेतय पण मी सल्ला देईल की बोलताना संवेदनशीलपणे बोललं पाहिजे. कारण बोलताना काही चूक झाली तर समाज मनावर वेगळा परिणाम होतो. निश्चितपणे जो लोकप्रतिनिधी असतील त्यांनी अशा घटनांवर बोलताना संवेदनशीलपणे बोलावं असा माझा सल्ला असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT