Cyber Crime Saam tv
महाराष्ट्र

Pune Cyber Crime: परदेशातून भेटवस्‍तू पाठविण्याच्या नावाने महिलांची फसवणूक; एकास अटक

Pune Crime News: परदेशातून भेटवस्‍तू पाठविण्याच्या नावाने महिलांची फसवणूक; एकास अटक

साम टिव्ही ब्युरो

सचिन जाधव

पुणे  : परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलांना गंडा घालणाऱ्या नायजेरियन चोरट्यांच्या टोळीतील एकास (Cyber Police) सायबर पोलिसांनी अटक केली. आरोपीकडून चार मोबाइल, हार्डडिस्क, पेनड्राईव्ह, सीमकार्ड, डेबीट कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. (Latest Marathi News)

सायबर पोलिसांनी राॅबिनहूड ओखू (वय ३९, सध्या रा. दिल्ली, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सोशल मिडीयातून महिलांना (Social Media) मैत्रीची विनंती पाठवून नायजेरियन चोरटे परदेशात वास्तव्यास असल्याची बतावणी करतात. सोशल मिडीयातून संवाद वाढल्यानंतर चोरटे परदेशातून भेटवस्तू पाठविण्याच्या आमिषाने महिलांंची फसवणूक करायचे.

भेटवस्‍तूंचे खोकेही ताब्‍यात

दिल्ली विमानतळावर सीमाशुल्क विभागाने भेटवस्तूंचे खोके ताब्यात घेतले आहे. महागड्या भेटवस्तूंचे खोके सोडविण्यासाठी तातडीने काही (Cyber Crime) रक्कम भरावी लागेल; अशी बतावणी करून चोरटे बँक खात्यात ऑनलाइन पद्धतीने पैसे पाठवण्यास भाग पाडायचे. अशा प्रकारच्या गु्न्ह्यात नायजेरियन चोरटे सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

TET Exam: आनंदाची बातमी! शिक्षकांची TET परीक्षेतून सुटका; विजय सरकारचा मोठा निर्णय

जनगणनेत OBC प्रवर्ग का नाही? राहुल गांधींचा पत्रातून पंतप्रधानांना सवाल

मराठी सक्तीला भाजपचा विरोध? मराठीची सक्ती, UP निवडणुकीची भिती?

Maharashtra News Live Update: कांद्याचे भाव पाडण्याचा डाव,दिल्लीला कांदा पाठवण्यास शेतकरी संघटनेचा तीव्र विरोध

Politics: भाजपचा 'एकला चलो'चा नारा, मित्र पक्षासोबत युती तोडली; राजकारणात खळबळ

SCROLL FOR NEXT