Pune News Saam TV
महाराष्ट्र

Pune News: रात्रीच्या अंधारात घराबाहेर पडला अन् विहिरीत उडी घेतली; पुण्यातील घटनेनं खळबळ

Pune Crime News: फुटेज पाहिल्यावर कुटुंबियांनी धावपळ करत विहिरीजवळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता.

Ruchika Jadhav

अक्षय बडवे

Pune Crime News:

पुण्यातील बाणेर येथे एक खळबळजनक घटना घडली आहे. कळमकर चौकामधील विहिरीत एका तरुणाने उडी मारून आपलं जीवन संपलंय. स्वप्निल राऊत असं आत्महत्या केलेल्या युवकाचं नाव आहे. या आत्महत्येमागे मानसिक आजार आणि घरगुती वाद असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३ नोव्हेंबर रोजी रात्री १२.३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे.स्वप्नील मूळचा बुलढाणा जिल्ह्याचा आहे. रात्री जेवण झाल्यानंतर घरातील सगळे झोपल्यावर या तरुणाने घरातून थेट विहीर गाठली आणि उडी मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी घरातील मंडळींना तरुण दिसला नाही.

त्यामुळे कुटुंबियांनी त्याचा शोध घेण्यास सुरूवात केली. पण त्याचा पत्ता लागला नाही. त्यामुळे विहिरी शेजारच्या सीसीटीव्ही कॅमेराचे फुटेज तपासण्यात आले. त्यावेळी तरुणाने स्वतः विहिरीत उडी मारल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसले. फुटेज पाहिल्यावर कुटुंबियांनी धावपळ करत विहिरीजवळ धाव घेतली. मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता.

युवकाचे वडील आणि भाऊ शेजारी असलेल्या सोसायटीत वॉचमन म्हणून काम करतात. स्वप्नील हिंजवडीमधील एका लहान कंपनीमध्ये कामाला होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याला मानसिक त्रास होत होता. त्याचबरोबर त्याच्या व्यसनामुळे घरात सतत भांडणे व्हायची. यातूनच या तरुणाने आत्महत्या केली असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

तरुणांमधील नैराष्याचे प्रमाण दिवेसंदिवस वाढत चाललेय. आयुष्यात येणाऱ्या अपयशांना सामोरे जाण्याऐवजी तरुण मुलं व्यसानांच्या आहारी जातात. व्यसनाधीन तरुणांना आपण काय करतोय आणि काय नाही हे समजत नाही. अशात काही तरुण रागाच्याभरात स्वत:चं जीवन संपवण्याचा निर्णय घेतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Pune Water Cut: पुणेकरांनो पाणी जपून वापरा, गुरूवारी पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांना बसणार फटका?

Mobile Safety Tip : मोबाईल भिजल्यावर तांदळाच्या डब्यात ठेवताय? जाणून घ्या खरंच फोन दुरूस्त होतो का

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

SCROLL FOR NEXT