Pune Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News: टँकरमधून पेट्रोल– डिझेलची चोरी; ८ टँकरसह आरोपी ताब्‍यात

टँकरमधून पेट्रोल– डिझेलची चोरी; ८ टँकरसह आरोपी ताब्‍यात

साम टिव्ही ब्युरो

पुणे : पेट्रोल वाहतूक करत असलेल्‍या टँकरमधून डिझेल व पेट्रोलची चोरी करून त्‍याची विक्री केली जात होती. अशी (Pune News) टोळी सक्रीय झालेली असताना पुण्याच्‍या हडपसर (Hadapsar) पोलिसांनी कारवाई करत ४ आरोपींना ताब्‍यात घेतले आहे. (Latest Marathi News)

पुण्यात पेट्रोल डिझेल चोरी प्रकरणी हडपसर पोलिसांच्या कारवाई केली आहे. अवैधरीत्या पेट्रोल चोरी करणारी टोळी सक्रीय झाली होती. या टोळीतील सदस्‍य पेट्रोलच्या टँकरमधून पेट्रोल चोरी करून बाहेर कमी दरात विकत होते. याबाबतची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्‍यानुसार पोलिसांनी कारवाई करत पेट्रोलची (Petrol) तस्करी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्‍या आहे.

सव्‍वा दोन कोटीचा मुद्देमाल जप्‍त

हडपसर पोलिसांनी केलेल्‍या कारवाईत २ कोटी २८ लाखांचा मुद्देमाल पोलीसांकडून जप्त केला आहे. यात हवाई इंधनाचे ८ टँकरसह, प्‍लास्‍टीकच्‍या कॅन, नळी असा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच ४ आरोपींना देखील अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Blood Pressure : BP नियंत्रणात ठेवायचा आहे? मग पाणी पिण्याच्या या 7 गोष्टी अजिबात दुर्लक्षित करू नका

Mumbai AC Local Train: लोकलचं AC बंद, प्रवासी गुदमरले; आता लोकलच्या आतही मृत्यूची भीती?

Amir Khan Marriage: आमिर खान लव जिहादचा ब्रँड अम्बेसेडर; तिसऱ्या लग्नावरून वाद उफाळला

कॉकरोच आंदोलन उधळण्याचा कट कुणाचा? अभिजीत दिपकेंच्या पोस्टनंतर ठाकरेंचाही दावा

Pune Weather Update: पाऊस येणार की नाही? कसं असेल हवामान? हवामान विभागाने वर्तवला पुढील चार दिवसांचा अंदाज

SCROLL FOR NEXT