Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: क्रिकेट बेटिंगमध्ये पैसे हरला; बेटिंग घेणाऱ्यानी केला बांधकाम व्यावसायिकाचा खून

क्रिकेट बेटिंगमध्ये पैसे हरला; बेटिंग घेणाऱ्यानी केला बांधकाम व्यावसायिकाचा खून

गोपाल मोटघरे

पुणे : क्रिकेट बेटिंग करण्याचे व्यसन लागल्‍याने कायम क्रिकेट बेटिंग लागत असते. या बेटींगच्‍या नादात २८ हजार रूपयांची उधारी झाली. उधारीचे पैसे देवू शकत नसल्‍याने संबंधीतांनी अपहरण (Kidnapping) करून त्‍यास मारहाण केली. या मारहाणीत जखमी झाल्‍याने त्‍याच मृत्‍यू झाला. (Letest Marathi News)

भारती विद्यापीठ (Police) पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या के. के. मार्केटजवळ ही खुनाची (Crime News) धक्कादायक घटना घडली आहे. खुनाच्या ह्या घटनेत संकेत रामचंद्र अंनभूले ह्या बांधकाम व्यवसायिकाचा मृत्यू झाला आहे. लहू माने, विशाल अमराळे आणि त्याच्या इतर काही साथीदारांनी मिळून मयत संकेत रामचंद्र अंनभूले याचा अपहरण करून खून केला.

कोरोना काळात झाला होता कर्जबाजारी

कोरोना साथीच्या काळामध्ये मयत संकेत अंनभूले हा कर्जबाजारी झाला होता. त्यामुळे त्याला क्रिकेट बेटिंग करण्याचे व्यसन लागले होते. क्रिकेट बेटिंग जिंकण्यासाठी तो लहू माने आणि विशाल अमराळे यांच्याकडे क्रिकेट बेटिंग लावायचा. यातच त्याच्यावर जवळपास 28 हजार रुपयाची उधारी झाली होती. ही उधारी वसूल करण्यासाठी आरोपींनी 16 नोव्हेंबरला संकेत अंनभूले याचे एका चारचाकी गाडीमध्ये अपहरण केले. अपहरण केल्यानंतर आरोपींनी के. के. मार्केटजवळील एका गाड्यांमध्ये संकेत अंनभूले याला बेदम मारहाण केली. त्या मारहाणी संकेत हा गंभीर जखमी झाला होता.

संकेतच्‍या वडीलांकडून पैसे केले वसूल

संकेत रामचंद्र अंनभूले हा पैसे देत नसल्याने. आरोपींनी त्याच्या वडिलांकडून गुगल पेवर 28 हजार रुपये वसूल केले आहेत. पैसे वसूल केल्यानंतर आरोपींनी गंभीर जखमी झलेल्या संकेत अंनभूले याची सुटका केली होती. संकेतला मित्राने घरी आणून सोडले. यानंतर संकेतने पत्‍नीला पाणी आणण्यास सांगितले. यानंतर त्‍याचा लागलीच मृत्‍यू झाला. या प्रकरणात भारती विद्यापीठ पोलिसांनी लहू माने, विशाल अमराळे आणि इतर काही आरोपी विरोधात खुणाचा गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: शाळेतील बोर्ड मिटिंगमध्ये अचानक कपडे काढू लागली महिला, अधिकारी पाहतच राहिले; VIDEO व्हायरल

Mira-Road : धक्कादायक! मिरा रोडमध्ये गरब्यात फेकली अंडी, तणाव वाढला | VIDEO

Idli Chutney Recipe: इडलीची चटणी खूप पातळं होतेय? मग ही खास स्टेप एकदा नक्की फॉलो करा

Maharashtra Live News Update: संघाच्या शताब्दी कार्यक्रमात पंतप्रधान मोदींच्या हस्ते टपाल तिकीट आणि नाणं जारी

Shirur News : फ्रेंड रिक्वेस्ट एक्सेप्ट न केल्याने भयानक कृत्य; टोळक्याचा तरुणावर जीवघेणा हल्ला

SCROLL FOR NEXT