Pune Crime Saam Tv
महाराष्ट्र

घरगुती भांडणातून राग अनावर; पतीने दुसऱ्या पत्नीसोबत केलं भयावह कृत्य

पोलिसांनी पीडित महिलेचा पती सोमनाथ लक्ष्मण वाघमोडे याला अटक केली आहे

गोपाल मोटघरे

पुणे : पहिल्या पतीच्या मुलाबरोबर झालेले भांडण सोडविण्याचा गेलेल्या महिलेला दुसऱ्या पतीने रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पुण्यातील (Pune) उरळी कांचन परिसरामध्ये गुरुवारी रात्री नऊ वाजता ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एका 40 वर्षीय विवाहित महिलेने लोणी काळभोर पोलिस (Police) स्टेशनमध्ये आपल्याशी दुसऱ्या पती विरोधात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पीडित महिलेच्या फिर्यादीवरून (Crime) लोणी काळभोर पोलिसांनी पीडित महिलेचा पती सोमनाथ लक्ष्मण वाघमोडे याला अटक केली आहे. (Pune Latest Crime News)

या घटनेतील फिर्यादी महिलेचा दुसरा पती सोमनाथ हा ट्रक चालक असून, त्यांचं फिर्यादी महिलेसोबत दुसरं लग्न झालेलं आहे. फिर्यादी महिलेला पहिल्या पतीपासून शेखर नामक 20 वर्षीय मुलगा आहे जो सध्या तिच्यासोबत राहतो. गुरूवारी रात्रीच्या सुमारास सोमनाथ वाघमोडे यांनी सावत्र मुलगा शेखर यास गाडीची चावी दिली नाही म्हणून जोरात चापट मारली. यामुळे सोमनाथ आणि मुलगा शेखर यांच्यात जोरदार भांडणाला सुरुवात झाली.

दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी फिर्यादी महिलेने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र भांडणादरम्यान सोमनाथ हा दारूच्या नशेत होता. यावेळी सोमनाथ याने रागाच्या भरात पेट्रोल आणून स्वतःच्याच पत्नीला पेटवून दिलं. या घटनेत फिर्यादी महिला गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादी महिलेच्या तक्रारीवरून लोणी काळभोर पोलिसांनी सोमनाथ वाघमोडेला अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check: महाराष्ट्राला 37 वा जिल्हा मिळणार? नवीन जिल्हा निर्माण होणार?

शिक्षक मतदारसंघात महायुतीत फूट, महायुतीत पाचही जागांवर बंडखोर

Latest New Mangalsutra Designs For Women: नवीन मंगळसूत्र घ्यायचंय? सध्या ट्रेंडमध्ये आहेत 5 डिझाईन्स

एक इंचही मागे हटणार नाही; MPSC विद्यार्थी आंदोलनावरून राहुल गांधींचं फडणवीस सरकारला चॅलेंज, VIDEO

ड्रग्ज सेवनामुळे एकाचा मृत्यू, शौचालयात ड्रग्जची डर्टी पार्टी

SCROLL FOR NEXT