Pune Crime News Saam TV
महाराष्ट्र

Pune Crime News: जमिनीसाठी अघोरी कृत्य! महिलांच्या साड्यांवर लिंबू, मटण आणि कलेजी ठेवून पूजा, धक्कादायक घटनेनं पुण्यात खळबळ

Pune Black Magic: तरुणासोबत भांडण झाल्याच्या रागातून नातेवाईकांनी त्याला आणि त्याच्या आईला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

Pune News:

पुणे शहराला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. मात्र आजही अनेक ठिकाणी अंधश्रद्धेच्या अघोरी घटना घडताना पाहायला मिळतात. पुण्यात जमिनीच्या वादातून एका महिलेवर जादूटोणा करणात आला आहे. महिलेची साडी चोरून त्याला लिंबू आणि टाचण्या टोचण्यात आल्यात. या घटनेबाबत महिलेच्या मुलाने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुण्याच्या चतु: श्रृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. तक्रार दाखल केलेल्या मुलाचे काही दिवसांपूर्वी त्याच्या कुटुंबातील अन्य नातेवाईकांसोबत भांडण झाले होते. तरुणासोबत भांडण झाल्याच्या रागातून नातेवाईकांनी त्याला आणि त्याच्या आईला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला.

बदला घेण्याच्या रागातून या नातेवाईकांनी तरुणाच्या आईची साडी चोरून नेली. त्यानंतर या साडीवर कुंकू टाकले. तसेच टाचण्या टोचल्या. आईच्या फोटोला देखील लिंबू आणि टाचण्या टोचण्यात आल्या होत्या. अशी तक्रार मुलाने केली आहे.

पोलिसांनी या प्रकरणी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाची आजी, मामा, सावत्र आई, भाऊ आणि चुलत बहीण यांनी संगमत करून कट रचून प्रॉपर्टीसाठी हा अघोरी प्रकार केला आहे. काही दिवसांपूर्वी फिर्यादी तरुणाने त्याच्या एका नातेवाईकाला मारहाण केली होती. या मारहाणीनंतर एकाच कुंटुंबात वाद होऊन दोन गट तयार झाले.

मारहाणीचा राग मनात धरून नातेवाईकांनी फिर्यादी तरुणाच्या आईसह मावशी, काकू यांच्या देखील साड्या चोरल्या. त्यानंतर साडीवर फोटो ठेवून फोटोच्या आणि साडीच्या बाजुला अंडी, टाचण्या लावलेले लिंबू, भात, कलेजी, मटण, हळद, रुकु, अगरबत्ती ठेवून जादूटोणा केला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Moong Dal Chilla Recipe: सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवा पौष्टिक आणि चविष्ट मूग डाळ चिल्ला, वाचा सोपी रेसिपी

Maharashtra News Live Update: विलास घुले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कार आणि चाकू SIT कडून जप्त

Nasarapur Case: नसरापूर प्रकरणावर उद्या अंतिम निकाल, आरोपी भीमराव कांबळेला फाशी की जन्मठेपेची शिक्षा?

६६१ कोटा घोटाळा प्रकरण; निवृत्तीच्या ४ दिवसाआधी IAS अधिकारी फरार, मोबाईलही बंद

मुसळधार पावसाने उडवली धांदल; यवतमाळ-बुलढाणा-वाशिममध्ये पूरसदृश्य स्थिती

SCROLL FOR NEXT