Pune News Saam tv
महाराष्ट्र

Pune News : पुण्यातील पुजार्‍यासह ७ शिष्यांचे अपहरण; पाच कोटींच्या खंडणीची मागणी, कर्नाटकमधून सुटका

Pune News : आरोपी घरी येऊन विजापुर येथे एकाच्या घराची पुजा करायची आहे. तसेच मुर्तीष्ठापना करायची असल्याचे सांगितलं. त्यासाठी तुम्ही कर्नाटकमध्ये या असं सांगून संबधितांनी पत्ता देऊन गेले

Rajesh Sonwane

अक्षय बडवे 
पुणे
: घराची पुजा व मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी बोलावून पुण्यातील पुजाऱ्यासह सात शिष्यांचे अपहरण करण्यात आले. इतकेच नाही तर तब्बल पाच कोटी रुपयांची खंडणीची मागणी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. 

पुण्यातील (Pune) बजरंग लांडे हे पुजारी आहेत. दरम्यान २९ जुलैला सायंकाळी बजरंग यांचा मुलगा स्वप्निल याला आरोपी घरी येऊन विजापुर येथे एकाच्या घराची पुजा करायची आहे. तसेच मुर्तीष्ठापना करायची असल्याचे सांगितलं. त्यासाठी तुम्ही कर्नाटकमध्ये या असं सांगून संबधितांनी पत्ता देऊन गेले. त्यानुसार लांडे व त्यांचे सात शिष्य हे सांगितल्यानुसार कर्नाटक येथे गेले. तेथे त्यांना कोणत्याही (Pune Police) घराची पुजा अथवा मुर्ती प्रतिष्ठापनेची मात्र काहीच तयारी दिसली नाही. 

याच वेळी पुण्यात भेटलेल्या तरुणांनी लांडे यांना त्यांच्या शिष्य यांच्यासह एका खोलीत डांबून ठेवलं. यानंतर फोनवरून त्यांच्या कुटुंबाला संपर्क करत ५ कोटींच्या खंडणीची मागणी केली. दरम्यान कुटुंबीयांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर घटनेची तात्काळ दखल घेत बिबवेवाडी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणद्वारे कर्नाटक पोलिसांशी संपर्क साधत त्यांना या प्रकरणाची माहिती दिली. यानंतर पुणे पोलिसांनी थेट रायचूर गाठत पुजाऱ्यांची सुटका केली. यानंतर रामु वळुन, दत्ता करे आणि हर्षद पाटील या तिघांना ताब्यात घेतले आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकणच्या विधान परिषद निवडणुकीत सुनील तटकरेच धुरंधर ठरण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana : सर्वात मोठी अपडेट! तब्बल ८० लाख लाडकीचा लाभ बंद, योजनेसाठी अर्जाची पुन्हा नोंदणी सुरू होणार का?

FYJC Admission 2026: अकरावी प्रवेशासाठी मोठा निर्णय! गुणपत्रक अन् शाळा सोडल्याचा दाखला नसतानाही मिळणार प्रवेश

Mumbai Rain Alert : मुंबईत मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी, 'या' शहरांना यलो अलर्ट जारी; वाचा हवामानाचा अंदाज

Famous Actress : एकेकाळची प्रसिद्ध अभिनेत्री आता रस्त्यावर मागतेय भीक, फोटो पाहून बसेल धक्का

SCROLL FOR NEXT