Pune Crime News Saam tv
महाराष्ट्र

Pune Crime News : आई-वडिलांना जीवे मारायची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, पुण्यातील घटनेने संताप

काळभोर पोलीस ठाण्यात दोन नराधमांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक

साम टिव्ही ब्युरो

अक्षय बडवे

पुणे : पुणे पुन्‍हा एकदा धक्‍कादायक घटना समोर आली आहे. आई– वडीलांना जीवे मारण्याची धमकी देत मागील पंधरा (Pune News) दिवसांपासून वारंवार बलात्कार केल्याची संतापजनक प्रकार पुण्यातील उरळी कांचन भागातून समोर आली. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी संताप व्‍यक्‍त केला असून राज्‍याच्‍या गृहमंत्र्यांन व्‍टीट करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. (Breaking Marathi News)

पीडित मुलगी आपल्या कुटुंबियांसह पुणे येथील उरळी कांचन परिसरात राहतात. दरम्‍यान बुधवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास पीडित मुलीची आई लघुशंकेसाठी बाहेर आली. त्यावेळी आयुब मुलीच्या खोलीबाहेर दिसला. पीडितेच्या आईला पाहून आयुब तिथून पळून गेला. यानंतर मुलीच्या खोलीचा दरवाजा उघडून पाहिल्यानंतर इरफान तिथेच होता. (Crime News) आईला पाहून त्याने सुद्धा पळ काढला. यानंतर मुलीने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार आईला सांगितला. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दोन नराधमांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

खासदार सुप्रिया सुळेंकडून व्‍टीट

आई, वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन मागील पंधरा दिवसांपासून आरोपी या मुलीवर अत्याचार करत होते. या प्रकरणी खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्‍याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना व्‍टीट करत घटनेतील आरोपींवर कठोर कारवाई होणे गरजेचे असून राज्‍याच्‍या गृहमंत्र्यांनी लक्ष घालून कारवाईची मागणी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: पुणे हादरले! दिराकडून भावजयीवर जीवघेणा हल्ला, कोयत्याने सपासप वार

Pre Primary School: नोंदणी अनिवार्य ! पूर्व प्राथमिक शाळांसाठी सरकार आणणार नवा कायदा

केरळमध्ये कमळ फुलवण्यासाठी भाजप लागली कामाला ;महाराष्ट्रातील दिग्गज नेत्यावर सोपवली मोठी जबाबदारी

Beed Crime: जमीन-ट्रॅक्टरसाठी नातं विसरला; जन्मदात्यासह बहीण आणि मेहुण्याला लोखंडी पाईपनं बेदम मारहाण

Rahuri By-Election: पवारांच्या नेत्याकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक, राहुरी पोटनिवडणुकीवरून राजकारण तापलं?

SCROLL FOR NEXT