Pigeons Theft in Pune Saam TV
महाराष्ट्र

Pigeons Theft in Pune: चोरांचा काहीच नेम नाही!; पुण्यात चक्क ८० कबुतरांसह सोन्याचे दागिने लंपास

Pune Crime News: याबाबत फिर्यादीने २२ जुलै रोजी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Ruchika Jadhav

Pune Crime News: पुणे जिल्ह्यात भोर तालुक्यातील नाटंबी गावातल्या एका घरातून चक्क ८० कबुतरांची चोरी करण्यात आलीये. कबुतरांसह घरातून सोन्याचे दागिने, १६ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केली आहे. (Latest Marathi News)

भोर तालुक्यातील आंबवडे खोऱ्यातील नाटंबी येथे ही घटना घडली आहे. १८ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते २० जुलै रोजी पहाटेपर्यंत चोरट्यांनी (Theft) सर्व सामान लंपास केलंय. याबाबत फिर्यादीने २२ जुलै रोजी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यानूसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ जुलैला फिर्यादी यांच्या घरातून लॅब जातीचा पांढऱ्या रंगाचा कुत्रा चोरून नेला आणि १८ जुलै रोजी रात्री घरातील कपाटातील सोन्याचे मंगळसूत्र आणि रोकड चोरीला गेली.

याशिवाय घराच्या बाजूला असलेल्या कबुतरांच्या ढाबळीतील शिराजीत, चुडीदार, पायनुस, रेसर, पहाडी-शिराजी अशा वेगवेगळ्या जातीची कबूतरे १२५ कबुतरे चोरली आहेत. या प्रकरणी भोर पोलिस अधिकचा तपास करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Drishyam 3 Cast Fee: 'दृश्यम 3'च्या स्टारकास्टची फी किती? अजय देवगणला तब्बूपेक्षा 528% अधिक मानधन

Pumpkin seeds: कोलेस्ट्रॉल मेणासारखं वितळेल आणि हार्ट अटॅकचा धोकाही होईल कमी, रोज सकाळी खा मूठभर 'या' बिया

Pune Accident: पुण्यात अपघाताचा थरार! भरधाव स्कूल बसची दुचाकीला धडक, विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

Maharashtra News Live Update: बीड जिल्ह्यात शेतकरी दुहेरी संकटात गतवर्षी ओला दुष्काळ तर यावर्षी कोरडा दुष्काळ

Political News : राजकीय वर्तुळात मोठी घडामोड! काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा, 'या' नेत्याकडे दिली जबाबदारी

SCROLL FOR NEXT