महाराष्ट्र

Pune Crime: पुणे हादरलं! ४ वर्षीय मुलीवर अत्याचार; तरुणाचे भयंकर कृत्य

Pune Crime: पुण्यातील कोथरुड भागात एका ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Pune Crime:

पुण्यातील कोथरुड भागात एका ४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडलीय. खाऊ देण्याच्या बहाण्यानं ३० वर्षीय व्यक्तीनं चिमुरडीवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केलीय. राजेश चोरगे असं अटक केलेल्या नराधमाचं नाव आहे. पीडितेच्या आजोबांनी कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून याप्रकरणाचा अधिक तपास कोथरुड पोलीस करत आहेत. (Latest Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या घरासमोर राहतात. शनिवारी फिर्यादी यांची ४ वर्षीय नात घराबाहेर खेळत होती. तेव्हा तेथे आरोपी चोरगे त्या आला. पीडितेला खाऊ देण्याच्या बहाण्याने जवळ असलेल्या शंतीबन चौकाजवळ घेऊन गेला. त्या ठिकाणी उभ्या असलेल्या बसच्या खाली नेऊन त्या या नराधमाने चिमुरडीवर अत्याचार केला. तिने आरडा ओरडा केल्यामुळे जवळ असलेल्या लोकांनी हे कृत्य पाहिले आणि त्या चिमुरडीला बसच्या खालून बाहेर काढलं.

तीन नराधमांकडून अत्याचार

मागील महिन्यात कोंढवा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घडली होती. तीन नराधमांकडून सामूहिक अत्याचार करण्यात आला होता. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतलंय. पीडितेनं पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी पॉस्को कायद्यांतर्गत तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला.

अल्पवयीन मुलगी घराशेजारील खेळत होती तेव्हा एका घराच्या खिडकीतून तिचं खेळणी त्या घरात पडली. त्या वस्तू देण्यासाठी ती त्या घरात गेली. तेव्हा आरोपींनी तिला घरात ओढून तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. दरम्यान अत्याचाराची घटना घडून तीन वर्ष झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

७५ लाख महिलांच्या खात्यावर ₹ १०,०००; रेवडी वाटपावर पवारांचा सवाल, फडणवीसांचे उत्तर, वाचा स्पेशल रिपोर्ट

Shubman Gill Hospitalised: भारताचा कर्णधार शुभमन गिल हॉस्पिटलमध्ये दाखल, नेमकं काय झालंय? महत्वाची अपडेट

Maharashtra Politics : धनंजय मुंडे स्टार प्रचारक, राष्ट्रवादीत वाद; सोळंकेंची मुंडेंविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार

Marathi–Hindi Language :पुन्हा मराठी-अमराठीचा वाद, मुंबई लोकलमधील राड्याचा व्हिडिओ व्हायरल

Indurikar Maharaj : या औलादी माझ्या मुळावर उठणार, इंदुरीकर महाराजांचे चॅलेंज; म्हणाले, मुलीचे लग्न....

SCROLL FOR NEXT