pune bangloare national highway
pune bangloare national highway 
महाराष्ट्र

'या' वाहनांसाठी एनएच ४ खूला हाेईल; प्रयत्न सुरु

Siddharth Latkar

सातारा : पुणे बंगळूर महामार्गावरील रस्त्यावर आज (रविवार) दाेन ते अडीच तीन फुटांवर पाणी आहे. पाण्याचा प्रवाह जादा आहे. त्यामुळे हा महामार्ग वाहतुकीसाठी आजही (रविवार) बंद ठेवण्यात आला आहे. वाहतुकरांनी प्रशासनाच्या आवाहनास उत्तम प्रतिसाद देत आपली वाहने जागेवर थांबवली आहेत. (pune-bangloare-national-highway-road-closed-sunday-transportation-sml80)

गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या पावासाने सातारा आणि काेल्हापूर जिल्ह्यात थाेडी फार उसंत घेतली आहे. सातारा आणि काेल्हापूर जिल्ह्यातील सर्वच नद्यांचे पाण्याची पातळीत वाढ झाल्याने पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गवरील रस्ते पाण्याने भरले हाेते. त्यामुळे शुक्रवारपासून या महामार्गावरील वाहतुक थांबविण्यात आली आहे.

शिरवळ ते सातारा या मार्गावर वाहतुकदारांना त्यांची वाहने बाजूला लावण्यास सांगण्यात आले हाेते. त्यानूसार दाेन दिवसांपासून शेकडाे वाहने रस्त्याच्या कडेला उभी आहेत. आज (रविवार) देखील पुणे बंगळूर महामार्गावर वाहनांना वाहतुकासाठी बंदी घालण्यात आली आहे. त्यास वाहतुकदारांनी प्रतिसाद दिला.

दरम्यान आज (रविवार) दुपारपर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी वाहतुक सुरु करावी का याबाबत प्रशासनाशी चर्चा करुन निश्चित केले जाईल अशी माहिती पाेलिस प्रशासनाने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. नागरिकांनी एनएच ४ महामार्गावर pune bangloare national highway वाहतुक टाळावी असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live : Manoj Jarange: मनोज जरांगे पाटील यांची 8 जून रोजीची सभा रद्द, भीषण दुष्काळामुळे निर्णय

Eknath Shinde : मोठी बातमी! नाशिकमध्ये हेलिपॅडवर CM शिंदेंच्या बॅगांची तपासणी

Ranjitsinh Naik Nimbalkar : कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लावाल तर मुळावर घाव घालू; रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा मोहिते पाटलांना इशारा

Milk Price : दूध उत्पादक शेतकरी आक्रमक; अंगावर दूध ओतून केला सरकारचा निषेध

Supreme Court on PMLA : सुप्रीम कोर्टाची ED अन् तपास यंत्रणांना चपराक; PMLA वर दिला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT