Kukdi dam Facebook
महाराष्ट्र

Kukdi Dam Water: पाणी संकट; कुकडी प्रकल्पातील ८ धरणांच्या पाणी पातळीत विक्रमी घट

Kukdi dam : कुकडी प्रकल्पातील येडगाव, माणिकडोह, वडज,पिंपळगाव, जोगे,डिंभे, विसापूर, चिल्हेवाडी,घोड या ८ धरणातून पाणी नियोजन केलं जातं, मात्र यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे. डिंसेबरपासूनच कुकडी प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग कालव्यातून सुरू झालाय. त

Bharat Jadhav

(रोहिदास गाडगे)

Kukdi dam Water Crisis:

पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. कुकडी प्रकल्पातील आठ धरणांच्या पाणी पातळीत घट झालीय. त्यामुळे पुढील काळात पाणी नियोजन व्यवस्थित व्हायला हवं अन्यथा पुढील काळात मोठ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे. (Latest News)

कुकडी प्रकल्पातील (Kukadi Project) ८ धरणांच्या पाणी पातळीत विक्रमी घट झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत जानेवारीपर्यत १७ टक्क्यांनी पाणीसाठ्यात घट होऊन सरासरी ७० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलाय. यामुळे पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील शेती (Agriculture) आणि पिण्याच्या पाण्याचे (Water) संकट निर्माण होण्याची शक्यता आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कुकडी प्रकल्पातील येडगाव,माणिकडोह,वडज,पिंपळगाव जोगे,डिंभे,विसापूर,चिल्हेवाडी,घोड या ८ धरणातून पाणी नियोजन केलं जातं, मात्र यंदा पाऊस कमी प्रमाणात झाल्याने पाणी टंचाईची समस्या निर्माण होणार आहे. डिंसेबरपासूनच कुकडी प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग कालव्यातून सुरू झालाय. त्यातच वातावरणातील तापमानमुळे पाण्याचे बाष्पीभवन होत आहे, त्यामुळे धरणांतील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होत आहे. यामुळे पुढील काळात पाणी नियोजन व्यवस्थित व्हायला हवं, अन्यथा पुढील काळात मोठ्या दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागणार आहे.

कुकडी प्रकल्पातील आठ धरणांचा पाणीसाठा

  • येडगाव, :- ८२.५४

  • माणिकडोह, :- ५५.६२

  • वडज, :- ८६.५०

  • पिंपळगाव जोगे, :- ६७.०२

  • डिंभे, :- ८३.९३

  • विसापूर, :- ५२.४४

  • चिल्हेवाडी, :- ९५.७६

  • घोड - ८४.३४

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Mumbai Crime: गार्डमध्ये जाऊन ड्रग्जचं इंजेक्शन घेतलं, मुंबईत तरुणाचा तडफडून मृत्यू

Shadashtak Yog 2026 : ९ ऑक्टोबरपासून धोकादायक योग! ४ राशींवर कोसळणार अडचणींचा डोंगर; तुमची रास तर नाही ना?

जगात पुन्हा लॉकडाऊन लागणार? रशियात लॅबमध्ये 'ती' एक चूक झाली अन् एकाचा मृत्यू; २०० जण क्वारंटाईन

Shreyas Iyer: ‘योग्य वेळ आली की तो राज्य करेल’, वैभव सूर्यवंशीच्या भवितव्याबाबत श्रेयस अय्यरचा मोठा विश्वास

SCROLL FOR NEXT