Ahmednagar-Pune Highway Accident Saam TV
महाराष्ट्र

Ahmednagar Accident : देवदर्शनाहून घरी निघाले, पण वाटेतच मृत्यूने गाठलं; भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, ११ जखमी

Ahmednagar-Pune Highway Accident : भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने भाविकांनी भरलेल्या पिकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

साम टिव्ही ब्युरो

Ahmednagar-Pune Highway Accident : भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने भाविकांनी भरलेल्या पिकअपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर ११ जण गंभीर जखमी झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये एका १४ वर्षीय मुलाचा देखील समावेश आहे. अहमदनगर-पुणे महामार्गावरील कामरगाव शिवारात ही दुर्देवी घटना घडली.  (Maharashtra Breaking News)

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक नागरिकांसह  पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी ३ भाविकांचे मृतदेह ताब्यात घेतले असून जखमींना तातडीने उपचारासाठी अहमदनगर (Ahmednagar) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देवदर्शनाहून येणाऱ्या भाविकांवर अचानक काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त भाविक हे देवगड आणि शनिशिंगणापूरचे दर्शन घेऊन पुण्याच्या दिशेने येत होते. त्याचवेळी पुण्याहून-नगरच्या दिशेने भरधाव वेगात ट्रक येत होता. दरम्यान, दोन्ही वाहने कामरगाव शिवारात आली असता, ट्रकचालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. (Latest Marathi News)

त्यामुळे ट्रक अनियंत्रित होऊन भाविकांच्या पिकअपला धडकला. ही धडक (Accident) इतकी भीषण होती की, यामध्ये ३ भाविकांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर ११ भाविक गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेनं मोठी हळहळ व्यक्त होत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

घरबसल्या ५ मिनिटांत ट्रान्सफर करा जुन्या कंपनीचा PF; चक्रवाढ व्याजाचा फायदा मिळवण्यासाठी फॉलो करा 'ही' एक ट्रिक

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 8व्या वेतन आयोगाबाबत लवकरच मोठा निर्णय होणार, किती असेल फिटमेंट फॅक्टर? वाचा...

Maharashtra News Live Update : मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालयासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवला

Health checkups after 40: वयाच्या 40 नंतर शरीरात सुरू होतात हे बदल, डॉक्टरांनी सांगितल्या या 4 टेस्ट करून घ्याच!

Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

SCROLL FOR NEXT