Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News : चालत्या कंटेनरला मागून जोरदार धडक; गाडीचे झाले दोन तुकडे, चालकाने नियंत्रण सुटल्याने अपघात

Pune News : पुणे- सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने एक चारचाकी भरधाव वेगात निघाली होती. सोरतापवाडी हद्दीतील वाकडा पूल या ठिकाणी गाडी आली असता चालकाचे चारचाकीवरील नियंत्रण सुटले

Rajesh Sonwane

सागर आव्हाड 
पुणे
: पुणे - सोलापूर महामार्गावरील सोरतापवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील वाकडा पूल परिसरात चारचाकीने कंटेनरला मागून जोरदार धडक दिली. मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास हि घटना घडली असून यात सुदैवाने कोणीतीही जीवितहानी झाली नाही. मात्र चारचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.  

पुणे- सोलापूर महामार्गावरून पुण्याच्या दिशेने एक चारचाकी भरधाव वेगात निघाली होती. सोरतापवाडी हद्दीतील वाकडा पूल या ठिकाणी गाडी आली असता चालकाचे चारचाकीवरील नियंत्रण सुटले. यानंतर महामार्गावर पुढे जात असलेल्या एका कंटेनरला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक एवढी जोरात होती की चारचाकी गाडीची एक बाजू पूर्णपणे निघून गेली होती. रात्रीची वेळ असल्याने जास्त रहदारी नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे. 

स्थानिकांनी चालकाला काढले बाहेर 
दरम्यान, अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिक व उरुळी कांचन येथील काही स्थानिक नागरिकांनी चारचाकीतील चालकाला सुखरूप बाहेर काढले. यामध्ये त्याला कोणतीही दुखापत झाली नव्हती. तर चारचाकी गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. गाडीची अवस्था पाहिल्यानंतर यात कोणी वाचले नसेल असेच चित्र होते. यावेळी मध्यरात्री पुणे व सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या नागरिकांनी अपघात पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. 

महामार्गावर वाहतूक कोंडी 

अपघात झाल्यानंतर येथे मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तर अपघातग्रस्त गाडी देखील महामार्गावर असल्याने दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी रात्री उशिरा महार्गावरील वाहतूक कोंडी सुरळीत केली होती. याप्रकरणी अद्याप उरुळी कांचन पोलीस ठाण्यात अपघाताची तक्रार देण्यात आली नसल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : मोठी बातमी! महाराष्ट्रातील ६४ नगरसेवकांवर कारवाई; ३ वर्षांसाठी अपात्र, कारण काय?

Maharashtra News Live Update: अमृत 2.0 योजनेअंतर्गत उल्हासनगरसाठी २११.०६ कोटींच्या स्वतंत्र पाणी योजनेला मंजुरी

Crime : बलात्कारपीडित १३ वर्षीय मुलीला न्याय हवा होता, ज्याच्याकडे मदत मागितली त्या वकिलानेही केले अत्याचार

Jana Nayagan: विजय थलापतींच्या 'जन नायकन'च्या रिलीजची तारीख ठरली; नवीन पोस्टर प्रदर्शित करत केली मोठी घोषणा

Bhandardara Tourism : छत्रीसारखा दिसणारा महाराष्ट्रातील 'हा' अनोखा धबधबा पाहिला का?

SCROLL FOR NEXT