Tuljapur, Tuljabhavani Temple, Tuljabhavani saam tv
महाराष्ट्र

Tulja Bhavani Mandir : भाविकांनाे तुळजाभवानी अभिषेक पुजेच्या शुल्कात माेठी वाढ, साेमवारपासून अंमलबजावणी; पुजा-यांचा विराेध

हा निर्णय भाविकांना रुचणार का अशी देखील चर्चा सुरु आहे.

Siddharth Latkar

Tulja Bhavani Mandir : तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी देवीच्या अभिषेक पुजेचे शुल्क ५० वरुन तब्बल ५०० रूपयांवर करण्यात आले आहेत. या निर्णयाची येत्या सोमवारपासून (ता.10 जूलै) अंमलबजावणी होणार आहे. (Maharashtra News)

श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी देश-विदेशातून भाविक (devotees) येत असतात. या मंदिर (Tuljabhavani Temple) व्यवस्थापनाची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत भाविकांकडून केल्या जाणा-या अभिषेक पूजेचे शुल्क वाढविण्याचा सर्वानुमते निर्णय झाला. यामध्ये अभिषेक पूजेचे शुल्क ५० वरुन तब्बल ५०० रूपयांवर केले गेले.

तसेच विश्वस्त कोट्यातील व्हिआयपी दर्शनासाठी प्रति व्यक्ती २०० शुल्क आकारण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.

या निर्णयाला पुजाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. पुजाऱ्यांच्या शिष्टमंडळाने निर्णय रद्द करावा यासाठी जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओम्बासे यांच्याकडे मागणी केली आहे. डाॅ. ओम्बासे पुजा-यांचा मागणीचा विचार करणार की येत्या सोमवारपासुन निर्णयाची अंमलबजावणी हाेणार हे पाहावे लागणार आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रायगडमध्ये पावसाची हजेरी

Parbhani Hanuman Temple: परभणीत मोठी दुर्घटना; हनुमान मंदिराचा सभा मंडप कोसळला, 7 जणांचा मृत्यू, 32 भाविक जखमी

Chanakya Niti : खोटं व्हायला शिका नाहीतर दुनिया देईल धोका, चाणक्यांनी सांगितली ५ गंभीर गुपितं

Face Care: रोजच्या प्रवासामुळे चेहरा पूर्ण डल झालाय? मग आठवड्यातून २ वेळा लावा ही घरी तयार केलेली पेस्ट

Mouni Roy: मौनी रॉयचा साडीमध्ये ग्लॅमरस अंदाज; कर्व्ही फिगर फ्लाँट करत शेअर केले भन्नाट फोटो

SCROLL FOR NEXT