Satyajeet Tambe Saam Tv
महाराष्ट्र

Teacher Graduate Constituency : सत्यजित तांबे यांना टीडीएफचा जाहीर पाठिंबा

नाशिक पदवीधर मतदारसंघच्या निवडणुकीत राज्यातील टिडीएफ एकमताने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Nashik News : पदवीधर, बेरोजगार ,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, डॉक्टर ,वकील यांसह विविध आस्थापनांमध्ये काम करणारे शासकीय व निमशासकीय कर्मचारी यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करणारे आमदार डॉ सुधीर तांबे यांच्याच कार्यकर्तुत्वाचा वारसा जपणारे अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी राष्ट्रीय शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ) ने अधिकृत जाहिर पाठिंबा दिला आहे.

महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी (टीडीएफ ) च्या राज्यकार्यकारणाची बैठक महाराष्ट्र (Maharashtra) हायस्कूल पुणे येथे झाली. या बैठकीत अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना टीडीएफ तर्फे उमेदवारीसाठी पुरस्कृत करण्यात आले.

यावेळी अध्यक्ष विजय बहाळकर म्हणाले की, टिडीएफ संघटनेच्या पाठिंबावर मागील तीन वेळा आमदार डॉ. तांबे यांनी प्रचंड मताधिक्याने विजय मिळवला आहे . सर्व पदवीधर व शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा विश्वास सार्थ ठरवताना त्यांनी मागील बारा वर्षात शिक्षकांचे व शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न प्राधान्याने सोडवले आहेत.

याचबरोबर सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ,पदवीधर या सर्व मतदारांशी सातत्याने संपर्क ठेवला आहे. शिक्षक आणि पदवीधर यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली आहे. याचबरोबर अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक जिल्ह्यातील सर्व टीडीएफच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत मोठ्या प्रमाणात नोंदणी केली आहेत.

आमदार डॉ.सुधीर तांबे व त्यांचा परिवार हा पुरोगामी विचार जपणारा असून नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यांना टीडीएफ पूर्ण पाठिंबा असल्याचेही ते म्हणाले

तर हिरालाल पगडाल म्हणाले की, लोकशाही, समाजवाद, विज्ञान निष्ठा ,धर्मनिरपेक्षता जपण्यासाठी पीडीएफने सातत्याने काम केले असून सत्यजित तांबे याच विचारांनी राज्यभर काम करत आहेत. म्हणून आगामी नाशिक पदवीधर मतदारसंघच्या निवडणुकीत राज्यातील टिडीएफ एकमताने त्यांना जाहीर पाठिंबा देत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO शटडाऊन! ३ दिवस बंद राहणार PF पोर्टल, 'ही' कामं करताना येणार अडचणी; ५ पर्याय कोणते?

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

SCROLL FOR NEXT