Ajit Pawar News Sharad Pawar  Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar: आज बीडमध्ये शरद पवारांची तोफ धडाडणार; 27 ऑगस्टला अजित पवारांची उत्तर सभा

Sharad Pawar News: आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीने भव्य रॅलीने पवारांचे स्वागत होणार आहे.

Ruchika Jadhav

Beed News: आज बीडमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची तोफ धडाडणार आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार यांची राज्यातील दुसरी आणि मराठवाड्यातील पहिली सभा आज बीडमध्ये होत आहे. आज आमदार संदीप क्षीरसागर यांच्या वतीने भव्य रॅलीने पवारांचे स्वागत होणार आहे. (Latest Marathi News)

या सभेसाठी शरद पवार हे छत्रपती संभाजी नगर येथून सकाळी 9:30 वाजता बाय कार बीडकडे प्रयाण आहेत. तर 12:30 वाजता बीड शहरात दाखल होणार आहेत. यादरम्यान बीड बायपास जवळील महालक्ष्मी चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.

दुपारी 2 ते 4 पर्यंत शरद पवार हे सभास्थळी असणार असून यादरम्यान ते जाहीर सभेतून विरोधकांवर तोफ डागणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता ते बीडहुन छत्रपती संभाजी नगर निघतील. दरम्यान या सभेतून शरद पवार हे नेमकं काय बोलणार ? याकडं सर्वांचे लक्ष लागले आहे.

अजित पवारांची होणार उत्तर सभा

शरद पवारांची बीडमध्ये सभा पार पडल्यानंतर 27 ऑगस्टला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये उत्तर सभा पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शरद पवारांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर देवगिरी बंगल्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची चर्चा झालीये. शरद पवारांच्या सभेनंतर उत्तर सभेचं धनंजय मुंडे यांच्यावतीने अयोजन करण्यात येईल अशीही माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: शिवसेना शिष्टमंडळाची महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा

Chilli Potato Recipe: घरच्या घरी बनवा रेस्टॉरंट स्टाईल चिली पोटॅटो; वाचा खास रेसिपी

Maharashtra To Bihar Amrit Bharat Train: पुणे ते दानापुर दरम्यान धावणार ट्रेन; जाणून घ्या अमृत भारत ट्रेनचा मार्ग, कोचसंख्या टाईमटेबल अन् थांबा

RBI Digital Fraud Rules: डिजिटल फसवणूक प्रकरणी आरबीआयचा मोठा निर्णय; बँक देणार नुकसान भरपाई

Maharashtra Politics: सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा झटका, 'त्या' एका निर्णयामुळे २ बड्या नेत्याचं पद गेलं

SCROLL FOR NEXT