Beed विनोद जिरे
महाराष्ट्र

अंबाजोगाईत लाच घेताना पीएसआय एसीबीच्या जाळ्यात

४० हजारांची लाच मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल

विनोद जिरे

बीड : बीडच्या अंबाजोगाई शहरात लाचखोर पीएसआय एसीबीच्या (ACB) जाळ्यात अडकला आहे. दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाईसाठी स्थानिक गुन्हे शाखेकडे न पाठवता, तहसिल कार्यालयात जामीन करण्यासाठी ५० हजार रुपयांच्या लाचेची (Bribe) मागणी. मात्र , तडजोड अंती ४० हजार रुपये लाच स्विकारण्याचे मान्य केल्यानंतर, बीडच्या (Beed) अंबाजोगाई शहर ठाण्यातील पीएसआयवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा-

गोपाल दिंगबरा सुर्यवंशी (वय-३४) रा. कामखेडा, ता रेणापुर असे लाचखोर पोलीस (Police) उपनिरीक्षकाचे नाव आहे. सुर्यवंशी हे अंबाजोगाई शहर ठाण्यात कार्यरत होते. त्यांनी तक्रारदार व त्याचा मित्र यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई स्थानिक गुन्हे शाखेकडे न करता अंबाजोगाई (Ambajogai) तहसील कार्यालयात करण्यासाठी, २६ एप्रिल रोजी तक्रारदारास ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडअंती ४० हजार रुपये स्विकारण्याचे मान्य केले.

बीड एसीबीकडून याची पंचासमक्ष खात्री करुन, लाचेची मागणी केल्याप्रकरणी, सुयर्वंशी यांच्यावर अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान यामुळे पुन्हा एकदा लाचखोरीने पोलीस प्रशासनातील सुरू असलेला भ्रष्टाचार चव्हाट्यावर आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: तुळजापुरात शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

Olya Khobryachi Karanji Recipe : ओल्या खोबऱ्याची करंजी बनेल एकदम खुसखुशीत, पीठ मळताना फॉलो करा 'या' ३ टिप्स

Maharashtra Drought: मोठी बातमी! राज्यात दुष्काळ जाहीर होणार, सरकारकडून हालचालींना वेग

Pakistan Afghanistan Conflict: पाकिस्तानकडून अफगाणिस्तानवर पुन्हा हवाई हल्ले; कुनार-पक्तिकामध्ये अनेक जण जखमी

दररोज खाव्यात अशा 7 हिरव्या भाज्या; शरीराला मिळतील ‘हे’ फायदे

SCROLL FOR NEXT