washim News  Saam tv
महाराष्ट्र

PSI विरोधात गंभीर तक्रारी वाढल्या; पोलीस अधीक्षकांकडून तडकाफडकी निलंबनाची कारवाई, कर्मचाऱ्यांच्या वर्तुळात खळबळ

washim latest news : वाशिमच्या PSI विरोधात गंभीर तक्रारी वाढल्या. त्यानंतर पोलीस अधीक्षकांकडून तडकाफडकी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

Vishal Gangurde

वाशिममधील PSI सुनील गिरी तात्पुरते निलंबित

सुनील गिरी यांच्या विरोधात अनेक गंभीर तक्रारी दाखल

चौकशी मंगरूळपीर SDPO यांच्याकडे सोपवण्यात आलीये

मनोज जायस्वाल, साम टीव्ही

अकोल्यात महिला कैद्याला शरीरसुखाची ASI राजेश जाधववर केलेली कारवाई ताजी असताना आता वाशिममध्ये पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांनी पोलीस उपनिरीक्षकानाचे थेट निलंबन केलं आहे. पोलीस उपनिरीक्षकावर निलंबनाची कारवाई केल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.

सुनील गिरी असे निलंबन केलेल्या पोलीस उपनिरीक्षकांचं नाव आहे. ते वाशिमA शहर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सुनील गिरी यांच्या विरोधातील गंभीर तक्रारींची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी ही मोठी कारवाई केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी यांच्या विरोधात अनेक गंभीर तक्रारी पोलीस अधीक्षकांकडे प्राप्त झाल्या होत्या. यात काही तक्रारी अंत्यत गंभीर स्वरुपाच्या होत्या, असं सांगितलं जात आहे. या गंभीर तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तत्काळ कारवाई करत सुनील गिरी यांना निलंबित केलं आहे.

तत्पूर्वी, या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी मंगरुळपीरचे एसडीपीओ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. तपासानंतरच आरोपांमध्ये किती तथ्य आहे, हे स्पष्ट होणार आहे.पीएसआय सुनील गिरी यांच्यावर झालेल्या निलंबनाच्या कारवाईनंतर वाशिम जिल्हा पोलीस दलात विविध चर्चांना उधाण आले आहे. आता सर्वांचे लक्ष मंगरूळपीर एसडीपीओ यांच्या तपास अहवालाकडे लागले आहे.

पोलीस अक्षीक्षक अनुज तारे काय म्हणाले?

सुनील गिरी यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईने पोलीस अधीक्षक अनुज तारे म्हणाले, 'वाशिम शहर पोलीस उपनिरीक्षक सुनील गिरी यांच्या विरोधात काही तक्रार प्राप्त झाल्या होत्या. यात काही गंभीर आरोप होते. त्यामुळे त्यांना तात्पुरते निलंबित करण्यात आलं आहे. त्यांची चौकशी मंगरूळपीर एसडीपीओ यांच्याकडे सुरू आहे. चौकशी झाल्यानंतर जो निर्णय घेण्यात येईल, त्या आधारावर त्यांच्यावर कारवाई होईल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : कर्मचाऱ्यांची दिवाळीत चांदी! पगार वाढणार, 'या' राज्यात DA मध्ये थेट 8% वाढ

Gold Rate Today: गणेशोत्सवात सोन्याचे दर पुन्हा घरसले, आज सोनं खरेदीची सुवर्णसंधी; 18k- 22k आणि 24k चे दर किती?

Sonam Maskar: कोल्हापूरच्या लेकीचा देशासाठी ‘अचूक निशाणा’; सोनमने आशियाई नेमबाजीत पटकावलं रौप्यपदक, वडिलांच्या संघर्षाचंही झालं चीज

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी, या आठवड्यात खात्यात जमा होणार ₹1500

Maharashtra News Live Update: जालनाच्या अंबडमध्ये दुकानाला भीषण आग, 4 ते 5 दुकानात जळून खाक

SCROLL FOR NEXT