माझ्या वरील आरोप सिद्ध करा; रवी राणा यांचे यशोमती ठाकूर यांना खुले चॅलेंज! SaamTv
महाराष्ट्र

माझ्या वरील आरोप सिद्ध करा; रवी राणा यांचे यशोमती ठाकूर यांना खुले चॅलेंज!

यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर एका शाळेची जमीन व मेळघाटातील आदिवासीची जमीन हडपल्याचा आरोप केला होता.

अरुण जोशी

अमरावती : अमरावतीत काल शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून आमदार रवी राणा यांनी जिल्हा नियोजन बैठकीपूर्वी कुजलेले सोयाबीन जाळून शेतकऱ्यांना दिवाळीच्या पुर्वी आर्थिक मदत देण्याचा ठराव जिल्हा नियोजन बैठकीत घेण्याची मागणी केली होती. तर या बैठकीत रवी राणा व पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची चांगलीच खंडाजंगी झाली होती.

हे देखील पहा :

तर, यशोमती ठाकूर यांनी रवी राणा यांच्यावर एका शाळेची जमीन व मेळघाटातील आदिवासीची जमीन हडपल्याचा आरोप केला होता. यावर अमरावतीत आमदार रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर देत माझ्यावरील आरोप १५ दिवसात सिद्ध करा, आरोप सिद्ध झाल्यास मी आमदारकीचा राजीनामा देतो. मात्र, आरोप सिद्ध न झाल्यास तुम्ही मंत्री पदाचा राजीनामा द्या अस खुले आव्हान रवी राणा यांनी यशोमती ठाकूर यांना दिले आहे.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचा ठराव जिल्हा नियोजन बैठक मध्ये घेऊ असे आश्वासन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांनी दिल होते. मात्र, तो ठराव घेतला गेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास यशोमती ठाकूर यांचा ताफा अडवून त्यांच्या गाडीची चावी काढून घेणार असल्याचे देखील रवी राणा यांनी सांगितले. त्यामुळे आता अमरावतीत राणा व ठाकूर यांच्यातील संघर्ष शिगेला पोहचला आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT