अमर घटारे, अमरावती
ऑगस्ट महिना संपत आला तरी देखील राज्यात म्हणावा तसा पाऊस (Maharashtra Rain) पडला नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळसदृष्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशामध्ये राज्यात दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकऱ्यांसह राजकीय नेत्यांकडून केली जात आहेत. याच मुद्द्यासह अनेक मुद्द्यांवरुन अमरावतीमध्ये आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर (Amravati Collector Office) आक्रोश मोर्चा काढला.
शेतात वन्य प्राण्यांच्या होणाऱ्या हैदोसामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अमरावती जिल्ह्यात पाऊस पडत नसल्यामुळे कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतातील पांदण रस्ते दुरुस्ती करावे, २४ तास शेतकऱ्यांना वीज पुरवठा करावा या मागण्यांसाठी आज अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनी एल्गार पुकारत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला.
सामाजिक कार्यकर्ते नितीन कदम यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांनी आज एल्गार पुकारत अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढला. यावेळी शेतकऱ्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्या. एका आठवड्याच्या आत जर वन्य प्राण्यांचा बंदोबस्त केला नाही तर आम्ही वन्यप्राणी शहरात आणून सोडू याला प्रशासन आणि सरकार जबाबदार राहील असा इशारा यावेळी त्यांनी प्रशासनाला दिला.
या आक्रोश मोर्चामध्ये शेतकरी स्वतः बैल गाडी घेऊन जिल्हाधिकारी कार्यलयावर धडकले होते. विविध लक्षवेधी फलकांच्या माध्यमातून मार्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तसंच या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी त्यांनी प्रशासनाला धारेवर धरत इशारा देखील दिला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.