Protest against Jitendra Awhad over Ram comment  saam tv news
महाराष्ट्र

Protest against Jitendra Awhad: जितेंद्र आव्हाडांचा निषेध... 'शरद पवार गटाचा पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही' (पाहा व्हिडिओ)

जितेंद्र आव्हाडांना महाराष्ट्रात फिरु देणार नाही असा इशारा शिवप्रतिष्ठानने दिला आहे.

Siddharth Latkar

- अक्षय बडवे / विजय पाटील / संदीप भोसले / दिलीप कांबळे / भूषण अहिरे / शुभम देशमुख

Protest against Jitendra Awhad over Ram comment :

प्रभू श्रीरामांबद्दल राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यभरात विविध हिंदुत्ववादी संघटना आव्हाडांचा निषेध नाेंदवित आहेत. राज्यातील सांगली, धुळे, मावळ, भंडारा, लातूर आदी ठिकाणी आमदार आव्हाडांच्या प्रतिकात्मक पुतळ्यास जाेडे माराे आंदाेलन करीत कार्यकर्त्यांनी आव्हाडांवर कारवाईची मागणी केली. दरम्यान अति शहाणा त्याचा बैल रिकामा म्हण ऐकली आहे. पवार साहेबांचा जो उरला सुरला गट आहे तो पक्ष संपवण्यासाठी दुसऱ्या कुठल्या पक्षाला काही करायची गरज नाही अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी आव्हाडांच्या वक्तव्यावर साम टीव्हीशी बाेलताना दिली.

सांगलीत शिवप्रतिष्ठान (shivpratishthan) आणि हिंदुत्ववादी संघटनांकडून आव्हाडांचा निषेध करण्यात आला. यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहनही करण्यात आले. या आंदोलनात मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा पुरावा द्यावा अन्यथा महाराष्ट्र राज्यात शिवप्रतिष्ठान कार्यकर्ते त्यांना अडवतील असा इशारा हणमंतराव पवार यांनी दिला.

बजरंग दलचे लातूरसह मावळात आंदाेलन

जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात लातूरमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक झाले हाेते. लातूर शहरातील गांधी चौकात राष्ट्रीय बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी जितेंद्र आव्हाड यांचा जाहीर निषेध केला. दरम्यान यावेळी संतप्त आंदोलकांनी आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध नाेंदविला.

मावळातील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यानी देहूरोड येथे माेर्चा काढला. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारून कार्यकर्त्यांनी जाहीर निषेध नाेंदविला. राज्य सरकारने याची गंभीर दखल घेऊन गुन्हा दाखल करावा अन्यथा बजरंग दलाच्या वतीने आव्हाङांना बजरंग दल स्टाईलने धडा शिकवला जाईल असा इशारा देण्यात आला.

धुळ्यात भाजप युवा मोर्चा आक्रमक

जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात धुळ्यात भाजप युवा मोर्चातर्फे पोलीस ठाण्यात करण्यात आली तक्रार दाखल. आझाद नगर पोलीस ठाण्यात भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यामुळे आता जितेंद्र आव्हाड यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

भंडा-यात आंदाेलन

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीराम बद्दल केलेल्या वक्तव्याबाबत जरी दिलगिरी व्यक्त केली असली तरी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये अजूनही त्यांच्याप्रती नाराजी दिसून येत आहे. भंडारा शहरात त्यांचे बॅनर घेऊन नारेबाजी करत आव्हाडांचा निषेध करण्यात आला. कार्यकर्त्यांनी पोलीस स्टेशन येथे आव्हाडांवर कारवाईच्या मागणीचे निवेदन दिले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मेडिकल स्टोरमधून औषधं घेताय? सावधान ! दैनंदिन वापरातील 157 औषधं धोकादायक?

जीवघेणे मॅनहोल बीएमसीची पोलखोल; महापौरांसमोरच कर्मचारी मॅनहोलमध्ये पडला

हॉटेलवाल्यांनो ! व्हेज-नॉनव्हेज वेगवेगळं ठेवा; किचन कसं असावं? तुकाराम मुंढेंनी सांगितले हॉटेलचे नवे नियम

Pune Ketan Agrawal Death Case: केतन अग्रवालचा जीव वाचला असता; आधीच संशय आला होता, पण..

Pune Crime: 2000 फोन कॉल, 238 तास चर्चा आणि 3 प्लॅन; पुण्याच्या कॅफेत रचला केतनच्या हत्येचा कट, वाचा इनसाईड स्टोरी

SCROLL FOR NEXT